राष्ट्रसंत गाडगेबाबा Rashtrasant Gadge Baba
राष्ट्रसंत गाडगेबाबा
!!! विनम्र अभिवादन !!!
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
संत गाडगे महाराज संत गाडगेबाबा यांना जंयत्ती / पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
जन्मदिन:- २३ फेब्रुवारी १८७६ मृत्यू :-२० डिंसेंबर १९५६
स्वच्छतेचे जनक, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असेसमाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.
आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगतदेव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत.
आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केलादेवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे. असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते
संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश :
●भुकेलेल्यांना = अन्न
●तहानलेल्यांना = पाणी
●उघड्यानागड्यांना = वस्त्र
●गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
●बेघरांना = आसरा
●अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
●बेकारांना = रोजगार
●पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
●गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
●दुःखी व निराशांना = हिंमत
●गोरगरिबांना = शिक्षण .
विदर्भातील थोर संत गाडगे बाबांना विनम्र अभिवादन !
राष्ट्रसंत स्वच्छतेचे जनक विदर्भातील थोर संत गाडगे बाबां यांच्या जीवन कार्यावर व जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा आणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्या करीता तसेच भाषण निबंध माहिती या साठी उपयुक्त प्रश्न मंजुषा सोडवा
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी
CLICK HERE

CLICK HERE

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
1 comments:
Click here for commentsThanks 🙏
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon