DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

World / International Teacher's Day

जागतिक शिक्षक दिन
जागतिक / आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन
World / International Teacher's Day

आज ५ ऑक्टोबर ! 
जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

    भावी पिढी समर्थ बनविणाऱ्या शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. ५ ऑक्टोबर १९६७ या दिवशी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी 'शिक्षकांचा दर्जा' या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. त्या अनुषंगाने १९९४ पासून युनेस्को तर्फे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातोय. जगभरातील सर्व गुरुजनांना, जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
      जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढीस समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे हा या दिनाचा उद्देश आहे. UNESCO तर्फे हा दिवस 1994 पासून जगभर सुमारे 100 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जात आहे.
जागतिक शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
    मागील महिन्यात (सप्टेंबर) याच ५ तारखेला आपण संपूर्ण भारतभर राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा केला... जो आपण दरवर्षी ५ सप्टेंबरला भारताचे माजी राष्‍ट्रपती सर्वपल्‍ली राधाकृष्णन यांच्या जन्‍मदिवस रूपाने साजरा करतो...
    आजचा ५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक / आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून अनेक देशांत साजरा केला जातो
    सन ५ ऑक्टोबर १९६६ साली युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांच्या संयुक्त अधिवेशनामध्ये "शिक्षकांचा दर्जा" या विषयावर आधारित विविध मुद्द्यांवरील शिफारशीवर तब्बल १०० देशांनी सह्या केल्या. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे आणि हेच उद्दिष्ट समोर ठेवून युनेस्कोतर्फे हाच दिवस १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जातो.. एज्युकेशन इंटरनॅशनल या संघटनेतर्फे सुद्धा हा दिवस जगभर पाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. 
    शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यत: समुदायामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सवांचा समावेश असू शकतो.
    शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना १९व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली; बहुतेक प्रकरणांमध्ये, ते स्थानिक शिक्षक किंवा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा साजरा करतात. इतर अनेक आंतरराष्ट्रीय दिवसांपेक्षा भिन्न देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्याचे हे प्राथमिक कारण आहे. उदाहरणार्थ, अर्जेंटिनाने १९१५ पासून ११ सप्टेंबर रोजी डॉमिंगो फॉस्टिनो सर्मिएन्टोच्या मृत्यूचे स्मरण शिक्षक दिन म्हणून केले आहे. भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर) यांचा जन्मदिवस १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि गुरुपौर्णिमा हा दिवस हिंदूंनी शिक्षकांची पूजा करण्याचा दिवस म्हणून साजरा केला. हिंदू धर्मग्रंथांनुसार, अध्यात्मिक गुरू बनवणे फार महत्त्वाचे आहे, अध्यात्मिक गुरूशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. खऱ्या अध्यात्मिक गुरूची ओळख पवित्र गीतेच्या अध्याय १५ श्लोक १ ते ४ मध्ये लिहिलेली आहे. २०२२ मध्ये शिक्षक दिन "अभार दिवस" ​​म्हणून साजरा करण्यात आला.
    सन १९९४ मध्ये युनेस्कोने स्थापन केलेल्या जागतिक शिक्षक दिनासोबत अनेक देश ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा शिक्षक दिन साजरा करतात.

भारतीय राष्ट्रीय शिक्षक दिन : ५ सप्टेंबर
जागतिक शिक्षक दिन : ५ ऑक्टोबर
इतर देशांचे शिक्षक दिवस
अल्बेनीया ७ मार्च
लेबेनॉन ९ मार्च
मलेशिया १६ मे
चीन १० सप्टेंबर
तैवान २८ सप्टेंबर
पोलंड १४ ऑक्टोबर
ब्राझील १५ ऑक्टोबर
चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया २८ मार्च
थायलंड १६ जानेवारी...

जागतिक शिक्षक दिन प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा 
World Teachers Day Quiz 

  CLICK HERE  
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon