पोलिस भरती अपडेट्स, १००% पद भरतीस मान्यता
पोलीस भरती आजचा GR...
11443 पदे मंजूर 100% पदे भरण्यासाठी मान्यता..
११,४४३ पदांची पोलीस भरतीला मान्यता
महाराष्ट्र शासन
गृह विभाग, मुंबई
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 11443 पदे भरण्यास
शासन निर्णय : GR काय सांगतो
सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संदर्भाधिन क्र. १ च्या शासन निर्णय, वित्त विभाग दि. १२/०४/२०२२ च्या तरतूदीमधून सूट मिळण्यासाठीच्या प्रस्तावास दि. २७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मा. मंत्रिमंडळाच्या दि. २७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२१ मधील पोलीस शिपाई गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता संदर्भ क्र. १ येथील वित्त विभाग, शासन निर्णय दि. १२/०४/२०२२ मधील तरतूदींमधून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय:
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई, गट-क या संवर्गातील सन २०२१ या वर्षात विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ११४४३ पदे १०० % भरण्यास शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि ०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क., दि. १२/०४/२०२२ मधील तरतुदींमधून सूट देण्यात येत आहे. २. प्रस्तुत प्रस्तावासाठी येणारा खर्च यासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. तसेच याद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरण्यात यावीत.
३. सदर शासन निर्णय
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
Police / Army/ MPSC / Bharti Quiz
पोलीस / सैन्य / सर्व भरती परीक्षा प्रश्नमंजुषा सोडवा
सोडविण्यासाठी खलील वर टिचकी CLICK HERE मारा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon