DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Agniveer Recruitment


अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल 
 केंद्र सरकारने अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये पुन्हा मोठा बदल केला आहे. यापुढे आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या भरतीसाठी पात्र असतील असे केंद्राने स्पष्ट केले आहे. 
 केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच प्रशिक्षणाचा वेळही कमी होणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे. 
कसा करता येईल अर्ज
अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट 


वर ऑनलाइन नोंदणी करायची आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 असून यानंतर निवड प्रक्रिया 17 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेअंतर्गत होणा-या भरतीसाठी 16 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे. 
16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर जनरलड्यूटी साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर तांत्रिकसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. 
 अग्निवीर लिपिक पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी 8वी-10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यात आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थीही अर्ज करू शकतील.
यापुढे आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही - अग्निवीर भरतीसाठी अर्ज करू शकणार 

अग्निवीरांची भरती प्रक्रिया बदलली, आधी CEE नंतर इतर टप्पे
भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (३ फेब्रुवारी) भारतीय सैन्यदलाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार सैन्यात भरतीसाठी  अनुक्रमे कॉमन एंट्रान्स टेस्ट, फिजिकल फिटनेस टेस्ट टेस्ट आणि मेडिकल (वैद्यकीय) टेस्ट अशा तीन टप्प्यांमध्ये ही परिक्षा होईल.
    यापूर्वी जी भरती प्रक्रिया होती त्यानुसार सर्वात आधी उमेदवारांची फिजिकल फिटनेस टेस्ट होत होती. त्यानंतर त्यांची मेडिकल म्हणजेच वैद्यकीय चाचणी केली जायची. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात उमेदवारांना सीईई म्हणजे कॉमन एंट्रान्स टेस्ट म्हणजे लेखी परिक्षा द्यावी लागत होती. आता भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. नव्या बदलांनुसार सर्वात आधी लेखी परिक्षा होईल. त्यानंतर फिटनेस टेस्ट होईल. या दोन चाचण्यांनंमतर वैद्यकीय चाचणी होईल.
    आतापर्यंत १९,००० अग्निवीर भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत. तर २१,००० अग्निवीर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सैन्यात दाखल केले जातील. त्यानंतर ४०,००० अग्निवीरांची निवड सैन्यदलात होईल. य़ावेळी नवीन भरती प्रक्रिया लागू केली जाईल. म्हणजेच आगामी ४०,००० अग्निवीर हे नवी भरती प्रक्रिया पार करून भारतीय सैन्यात दाखल होतील.
 भरती प्रक्रिया का बदलली?
    भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी लागणारा मोठा प्रशासकीय खर्च आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनाचा विचार करता भरती पक्रियेत बदल करण्यात आला आहे.
    आधीच्या प्रक्रियेनुसार मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदरावांचं स्क्रीनिंग केलं जात होतं. यामुळे प्रशासनावरील दबाव वाढत होता. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा बळ तैनात केलं जात होतं. तसेच भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी देखील उपस्थित असतं. नवीन भरती प्रक्रियेमुळे भरती मेळाव्यांवरील खर्च खूप कमी होणार आहे. तसेच प्रशासकीय आणि लॉजिस्टिक भार कमी होईल.
भारतीय वायुसेनेत अग्निवीरवायु भरती ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय अग्निवीरवायु भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या संदर्भात विंग कमांडर दिनेशकुमार यांनी आवाहन केले या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, उंची, मासिक वेतन अन्य सुविधा याबाबत तसेच ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरावा याबाबतची सविस्तर माहिती

 CLICK HERE 


या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळास भेट देऊन माहिती घ्यावी व अर्ज सादर करावा,

Agniveer Recruitment Notification अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी 
Notification issued by Indian Army for Agniveer Recruitment

अधिसूचनेनुसार आठवी आणि दहावी उत्तीर्ण युवकही अर्ज करू शकतात

अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी नोंदणी जुलै पासून


    अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारतीय लष्कराने Indian Army आवश्यक अधिसूचना जारी Notification Issued केली आहे. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलैमध्ये सुरू होईल. अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील आहे. जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. Notification issued by Indian Army for Agniveer Recruitment

अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी भरती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा पदवी मिळणार नाही. याशिवाय सैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या कॅन्टीनची सुविधाही अग्निवीरांना मिळणार नाही. अग्निवीरांना कोणताही महागाई भत्ता किंवा लष्करी सेवा वेतन मिळणार नाही. भारतीय लष्कराच्या अधिसूचनेनुसार Notification आठवी आणि दहावी उत्तीर्ण युवकही अर्ज करू शकतात.

    अग्निवीरांच्या पहिल्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलै महिन्यात सुरू होईल. ८३ भरती मेळाव्यातून सुमारे ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी 


 या संकेतस्थळावर भेट द्यावी लागले. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वतःच्या अधिसूचना जारी करतील. अधिसूचनेनुसार आर्मीमध्ये अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्या मिळतील.

    अग्निपथ योजनेअंतर्गत भरती मेळावे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आयोजित केले जातील. डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात सुमारे २५,००० भरतीचे प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षणार्थी अग्निवीरांची दुसरी तुकडी २३ फेब्रुवारी २०२३ च्या सुमारास प्रशिक्षण सुरू करेल. सुमारे ४०,००० जवानांच्या निवडीसाठी देशभरात एकूण ८३ भरती मेळावे घेण्यात येणार आहेत.

खालिल पदांसाठी होणार भरती

अग्निवीर जनरल ड्युटी Agniveer General Duty

अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन/एम्‍यूनेशन) Agniveer Technical Aviation / Anmunition  Examiner 

अग्निवीर लिपिक/स्टोअरकीपर तांत्रिकAgniveer Clerk / Store Keeper Technical 

अग्निवीर ट्रेड्समैन दहावी पास Agniveer Tradesmen Std 10th pass

अग्निवीर ट्रेड्समैन आठवी पास Agniveer  Std 8th pass

अग्निवीरांचा किती असेल पगार

    अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

AGNIVEER_RALLY_NOTIFICATION.pdf   Download 

मित्रांनो     Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर 

          Download File            

वर टिचकी मारा 
Download File
 


Agnipath Booklet Download 


CLICK HERE



हेही वाचा: अग्निवीरांचीभरती अन् परीक्षेची तारीख घोषित जाणून घ्या तपशील

Tag -  Please Solve Quiz  Police / Army / MPSC / All Bharti GK Quiz
#dnyanyatritantrasnehigooglenews   
 #NotificationIssue 
#IndianArmy 
#AgniveerRecruitment 
#dnyanyatritantrasnehi 
Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
firstfly
admin
June 27, 2022 at 11:20 AM ×

I would like to thank you for the efforts you have made in writing this article.
Best Aviation Academy in Chennai 2022
Aviation Academy in Chennai

Congrats bro firstfly you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon