DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

जागतिक वारसा सप्ताह : प्रश्न मंजुषा World Heritage Week Quiz

"जागतिक वारसा सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर" 
प्रश्न मंजुषा 
शेवटी दिली आहे सोडवा 

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
    भारतीय सांस्कृतिक ठेव..... इतिहास आणि पुरातन दस्तऐवज ही आपली राष्ट्रीय संपत्ती असते .तो आपला सम्पन्न वारसा असतो . हा वारसा जतन केला जावा म्हणून आपण भारतीय फार उदासीन असतो. आपल्याला आपल्या परिसराचाच भूगोल आणि इतिहास माहिती नसतो तिथे राष्ट्राचा कुणी सांभाळावा ?     

     पण काही असे वेडे लोकं असतात जे मान सन्मान प्रसिद्धी पैसा याचा विचार न करता झपाटून या सम्पन्न वारशाचे जतन व्हावे तसेच हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवावा यासाठी काम करतात . 

*********************************
@ १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर @
जागतिक वारसा सप्ताह
*********************************

    दि. १९ नोव्हेंबर ते दि. २५ नोव्हेंबर युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे दरवर्षी World Heritage Week म्हणजे जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. दरवर्षी १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या काळात जागतिक वारसा स्मरणाचे उपक्रम आयोजित केले जातात.
    जागतिक वारसा म्हणजे काय ? प्रत्येक देशाला जशी स्वत:ची संस्कृती, परंपरा आणि आस्था असते तशीच ती संपूर्ण विश्वालाही असते. 'हे विश्वची माझे घर' असा संदेश आपल्याला भारतीय संस्कृती देते. आपला प्राचीन वारसा सांभाळणे, त्याची काळजी घेणे तसेच त्यांच्या अभ्यास करून त्याविषयी अधिक माहिती घेणे असे यात अभिप्रेत असते.
    शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात आपण अशा जागतिक वारसास्थळांची नावे वाचलेली असतात, पण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला वाटली पाहिजे. शक्य झाले तर त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटही दिली पाहिजे. आणि अशा ठिकाणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे हे या निमित्ताने लक्षात घेले पाहिजे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (Archaeological Survey of India) विशेष प्रयत्न यासाठी केले जातात. सहायक पुरातत्व संचालक (एडीए) आणि राज्य पुरातत्त्व विभाग आणि विविध राज्यात शाळा तसेच महाविद्यालये, विविध संस्था यांच्यामार्फत सुद्धा जागतिक वारसा दिनानिमित्त जाणीव जागृती करण्यासाठी प्रदर्शने, स्पर्धा, व्याख्याने यांचे आयोजन केले जाते.
     भारतातील वारसा स्थळे याविषयी आवर्जून मांडणी करण्याची संधी घेतली जाते.जागतिक वारसा स्थळे म्हणून भारतातील ३७ ठिकाणे ही ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यापैकी २९ स्थळे ही सांस्कृतिक असून ७ स्थळे ही नैसर्गिक ठिकाणे आहेत तर उरलेले एक स्थळ हे मिश्र स्वरूपाचे आहे.
सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या समृद्ध आणि संपन्न असलेली भारतातील जागतिक वारसास्थळे याप्रमाणे -
ताजमहाल (आग्रा)
खजुराहो (मध्ये प्रदेश)
हंपी (कर्नाटक)
अजिंठा लेणी (महराष्ट्र)
वेरूळ (महाराष्ट्र)
बोधगया (बिहार)
सूर्य मंदिर कोणार्क (ओडिसा)
लाल किल्ला (दिल्ली)
सांचीचा स्तूप (मध्य प्रदेश)
बृहद्दीश्वर मंदिर (तंजावर)
काझीरंगा अभयारण्य (आसाम)
महाबलीपुरम मंदिरे (तमिळनाडू)
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल)
हुमायूनची कबर (नवी दिल्ली)
जंतर मंतर (जयपूर,राजस्थान)
आग्रा किल्ला (उत्तर प्रदेश)
फतेपूर सिक्री (उत्तर प्रदेश)
रानी की वाव (पाटण,गुजरात)
पट्टदक्कल मंदिर समूह (कर्नाटक ) 
घारापुरी लेणी (महाराष्ट्र)
नालंदा विद्यापीठ आणि विहार (बिहार)
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक (मुंबई)
भारतातील पर्वतीय रेल्वे
कुतुब मिनार (दिल्ली)
चंपानेर पावागढ पुरातत्व उद्यान (गुजरात)
 हिमालय राष्ट्रीय उद्यान (हिमाचल प्रदेश)
पर्वतीय किल्ले (राजस्थान)
ख्रिस्ती प्रार्थना स्थळे (गोवा)
भीमबेटका शैलाश्रय (मध्ये प्रदेश)
मानस वन्यजीव अभयारण्य (आसाम)
केवलादेव राष्ट्रीय उद्यान (भरतपूर,राजस्थान)
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, पुष्पदरी (उत्तराखंड)
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (सिक्कीम)
कॅपिटल कॉम्पलेकस (चंदीगड)
ऐतिहासिक शहर (अहमदाबाद)
Victorian & Art Deco Ensemble (मुंबई)
गुलाबी शहर (जयपूर)
        या यादी मध्ये आपल्याला वैविध्य दिसून येते. यामध्ये कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साहचार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे 
        यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे. भारतीय परंपरेत जुन्या काळातील अनेक गोष्टी आजही जपून ठेवल्या जातात. गोव्यातील प्रार्थना मंदिरे हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे. डोळस आणि शोधक नजरेने आपण हा वारसा सांभाळूया, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न नक्की करुया आणि जागतिक वारसा सप्ताह साजरा करुया.

खालील दोन प्रश्न मंजुषा सोडून आपलेही योगदान देऊ या !
******************************** 
जागतिक वारसा सप्ताह.  : प्रश्न मंजुषा                                                    
World Heritage Week Quiz
CLICK HERE  
 
 

SUBSCRIBE FOR NEXT UPDATE 


CLICK HERE  
 
जागतिक वारसा : प्रश्न मंजुषा                                                    
World Heritage 
प्रश्न मंजुषा सोडविण्या साठी या ओळीला स्पर्श करा         

SUBSCRIBE FOR NEXT UPDATE 

🇮🇳  “अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा”
उत्सव आझादी का !
7⃣5⃣
अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा !
उत्सव आजादी का !

संपूर्ण वर्षभर ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.कॉम या वेबसाईट तर्फे राबविले जात आहेत उपक्रम

परकियांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या,स्वराज्याच्या यज्ञकुंडात आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य वीरांची ओळख भावी पिढीला व्हावी तसेच स्वराज्याची ज्योत अखंड तेवत राहावी तसेच संपूर्ण भारताचा सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक इतिहास व विविधतेची ओळख तसेच महत्प्रयासाने प्राप्त झालेली,निर्माण केलेली लोकशाही व तिच्या आधार स्तंभाची माहिती व्हावी यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२१ ते दि १५ ऑगस्ट २०२२ या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज खालील प्रमाणे आयोजन केलेले आहे तरी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक समाजातील सर्वच घटकांनी या उपक्रमात सामील व्हावे असे ज्ञानयात्री तंत्रस्नेही शरद देशमुख आवाहान करत आहेत.
सत्र पहिले - 
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र दुसरे - 
भारताच्या संपूर्ण घटक राज्याची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र तिसरे -
गाथा बलिदानाची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र चौथे - 
लोकशाहीचे आधारस्तंभ कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ ,न्यायमंडळ,स्वायत्त संस्था,समाज माध्यमे / पत्रकारिता यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र पाचवे -
बेटी बचाव बेटी पढाव,पढेगा भारत तो ही बढेगा भारत,तंत्रज्ञान विषयक मोफत कार्यशाळा जसे वेबसाईट,यूटुब चानेल ,इ-कॉमर्स वेबसाईट निर्मिती  इत्यादी
        संपूर्ण वर्षभर एकही दिवस न चुकता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव https://wwwdnyanyatritantrasnehi.com 
ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.कॉम तर्फे  उत्साहात साजरा केल्या जात आहे त्यामुळे सर्व ज्ञानचक्षूनी या उपक्रमात सामील होऊन आपले योगदान द्यावे ही  सविनय विनंती 

माहिती स्त्रोत  / साभार - Google
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon