अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा !
उत्सव आजादी का !
संपूर्ण वर्षभर ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.कॉम या वेबसाईट तर्फे राबविले जात आहेत
उपक्रम
परकियांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या,स्वराज्याच्या यज्ञकुंडात आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य वीरांची ओळख भावी पिढीला व्हावी तसेच स्वराज्याची ज्योत अखंड तेवत राहावी तसेच संपूर्ण भारताचा सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक इतिहास व विविधतेची ओळख तसेच महत्प्रयासाने प्राप्त झालेली,निर्माण केलेली लोकशाही व तिच्या आधार स्तंभाची माहिती व्हावी यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२१ ते दि १५ ऑगस्ट २०२२ या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज खालील प्रमाणे आयोजन केलेले आहे तरी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक समाजातील सर्वच घटकांनी या उपक्रमात सामील व्हावे असे ज्ञानयात्री तंत्रस्नेही शरद देशमुख आवाहान करत आहेत.
सत्र पहिले - महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र दुसरे - भारताच्या संपूर्ण घटक राज्याची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र तिसरे - गाथा बलिदानाची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र चौथे - लोकशाहीचे आधारस्तंभ कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ ,न्यायमंडळ,स्वायत्त संस्था,समाज माध्यमे / पत्रकारिता यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र पाचवे - बेटी बचाव बेटी पढाव,पढेगा भारत तो ही बढेगा भारत,तंत्रज्ञान विषयक मोफत कार्यशाळा जसे
वेबसाईट,यूटुब चानेल ,इ-कॉमर्स
वेबसाईट
निर्मिती इत्यादी
संपूर्ण वर्षभर एकही दिवस न चुकता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव https://www. dnyanyatritantrasnehi.com उत्साहात साजरा केल्या जात आहे त्यामुळे सर्व ज्ञानचक्षूनी या उपक्रमात सामील होऊन आपले योगदान द्यावे
बदरुद्दीन तैयबजी : प्रश्नमंजुषा
बदरुद्दीन तैयबजी
जन्म - १० ऑक्टोबर १८४४ मृत्यू १९ सप्टेंबर १९०६
राष्ट्रीय काँग्रेसच्या आद्यपर्वातील एक थोर मुस्लिम पुढारी आणि मुस्लिम समाजात निधर्मवादी भूमिका घेणारे व गोषा पद्धतीविरुद्ध प्रचार करणारे पहिले समाजसुधारक. त्यांचा जन्म दिनांक १० ऑक्टोबर १८४४ रोजी मुंबई येथे अरबमुसलमान कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव तय्यब अली भाईमिया व आईचे नाव अमीना होते. त्यांचे पूर्वज पूर्वी अरब देशातून येऊन गुजरातमधील खंबायत येथे व्यापार करू लागले आणि नंतर तेथून मुंबईला येऊन स्थायिक झाले. त्यांची आई अमीना आणि वडील भाई मियान हे सनातनी सुलेमानी मुसलमान कुटुंबातील होत, असे असले तरीही बद्रुद्दीननी पुढील आयुष्यात पाश्चात्य शिक्षणाची कास धरली आणि लंडनमध्ये पुढील शिक्षणासाठी वास्तव्य केले, पण शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नेत्ररोगामुळे त्यांना मुंबईस परतावे लागले.आपल्या लंडनमधील वास्तव्यात नेहमीच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांनी फ्रेंच, उर्दू, फार्सी, अरबी वगैरे भाषांचा अभ्यास केला. भारतात एक वर्षभर राहून पुन्हा ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तत्पूर्वी त्यांनी रहत-उन-नफ्स या युवतीबरोबर विवाह केला.
इ.स.१८७५ ते इ.स.१९०५ याकाळात ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य होते. इ.स.१८७६ मध्ये स्थापन झालेल्या अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेचे बद्रुद्दीन संस्थापक सदस्य होते. सन १८६७ मध्ये ते बॅरिस्टर होऊन भारतात परत आले आणि मुंबईस कायदेपंडित म्हणून त्यांनी लवकरच नावलौकिक मिळविला. सुमारे दहा वर्षे त्यांनी वकिली केली. १८७१ मध्ये त्यांनी सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला आणि १८८२ मध्ये ते मुंबईच्या कायदेमंडळावर निवडून आले. १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. त्यात बद्रुद्दीन यांनी सर्व सहकार्य दिले, पण अधिवेशनास ते हजर राहू शकले नाहीत. मात्र १८८७ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १८७८ मध्ये पडलेल्या दुष्काळात तसेच १८९८ मधील प्लेगच्या साथीच्या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले व जनतेस सर्वतोपरी मदत दिली.
सन १८७६ मध्ये भावाच्या सहकार्याने त्यांनी मुसलमानांच्या शिक्षणाकरिता अंजुमन-ई-इस्लाम या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. मुसलमान समाजाचा मागासलेपणा घालविण्यासाठी त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य केले. गोषा पद्धतीविरुद्ध त्यांनी मोहीम काढली. त्यांनी आपल्या घरातून पडदापद्धती बंद करून मुलींना शिक्षणासाठी परदेशात पाठविले. संमतिवयाच्या कायद्याला हिंदू आणि मुसलमान यांचा विरोध असतानासुद्धा त्यांनी १८९१ मध्ये पाठिंबा दिला.
मुंबईच्या उच्च न्यायालयाचे १९०२ मध्ये ते न्यायाधीश झाले. हा मान मिळविणारे ते पाहिले भारतीय होते. न्यायालयात राष्ट्रीय काँग्रेसची निंदा करण्यास त्यांनी मज्जाव केला,तसेच लो. टिळकांना तीन न्यायाधीशांनी जामीन नामंजूर केला असता,त्यांनी तो मंजूर केला. एक निस्पृह व निःस्वार्थी न्यायाधीश म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. महात्मा गांधींनी ‘काँग्रेसच्या सर्व सभांमधील एक महत्त्वाचा निर्यायक दुवा’ असे त्यांचे वर्णन हरिजन (१८ नोव्हेंबर १९३९) या पत्रिके मध्ये केले होते.
मुंबईतील मुसलमानांमध्ये सामाजिक विषयांच्या संवादाला चालना मिळावी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या 'इस्लाम क्लब' आणि 'इस्लाम जिमखाना' या दोन्ही संस्थांच्या स्थापनेत तय्यबजी यांचे मोलाचे योगदान होते.इ.स.१९०६ मध्ये लंडन येथे रजेवर गेले असता त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon