#Thank A Teacher
=================
मार्गदर्शन - मातृतुल्य अनिताताई सरनाईक अध्यक्षा
तसेच
प्राचार्य मा.अरुणभाऊ सरनाईक
=================
निर्मिती- शरद दत्तराव देशमुख तंत्रस्नेही शिक्षक श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, वाशिम
=================
#Thank A teacher
-----------------------------
संदर्भ- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि.३१ ऑगस्ट,२०२१
प्रस्ताविक,
भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त पाच सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात येतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो Covid -19 या रोगाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शिक्षक दिन नेहमीप्रमाणे साजरा करता येणे शक्य नसले तरी त्या व्यक्तीबद्दल 5 सप्टेंबर 2021 ला प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी पालक शिक्षक अधिकारी सर्व क्षेत्रातील मान्यवर व समाजातील सर्वांना आपल्या जीवनात ज्या व्यक्तीला गुरु मानतो त्यांच्याप्रती आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी #Thank A Teacher अभियान ही मोहीम दिनांक २ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत राबवायची आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत जाते आयुष्याच्या या वळणावर या शिक्षकांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते आपल्याला आवश्यक असेल अशावेळी आपल्याला आत्मविश्वास जागृत करून संपादनासाठी प्रोत्साहित केले असते ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे *आभार* व्यक्त करण्यासाठी शासनाने एक अभियान राबविण्याचे ठरविले आहे त्यासाठी मी या अभियानांतर्गत ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आपल्या आवडत्या शिक्षका बद्दल भावना व्यक्त करण्याची संधी सर्वांना #Thank A Teacher या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Covid - 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत त्यासाठी शिक्षकांची नवीन कौशल्य, नवीन शैक्षणिक साधने, वापरण्याची इच्छा दिसून येते केवळ शाळेमध्ये जाऊन शिकवणे यापलीकडे जाऊन आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षक मुलांना शिक्षण देत आहेत ज्या ठिकाणी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा ठिकाणी काही शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन मुलांच्या घरा पर्यँत जाऊन त्यांना शिक्षण, ज्ञानदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत असे हे शिक्षक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाले,जी प्रगती झाली ते शब्द रूपाने व्यक्त करण्यासाठी *#Thank A Teacher* ही मोहीम आपल्या शाळेमध्ये शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत आहे.
वकृत्व, निबंध,पोस्टर घोषवाक्य, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन,अभिवाचन स्पर्धा शिक्षक दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी विविध विषय घेऊन ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे त्या संबंधीची वेगळी सूचना उपलब्ध करून देण्यात येत आहे
यामुळे मध्ये या मोहिमेमध्ये आपल्या सर्व शिक्षकांना सहभाग नोंदवायचा असून वर दिलेल्या लिंकच्या या सोबत पाठवत असलेल्या व्हाट्सअप क्यू आर कोड च्या माध्यमातून माध्यमातून आपण व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व सदरचा हा मेसेज आपल्या शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्या पर्यंत पोचवून या ग्रुपला जॉईंट होण्यास सांगावे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या गुरूला त्याचे प्रती असलेल्या भावना व्यक्त करुन शब्दरूपी गुरुदक्षिणा द्यावी आपल्याला मिळालेले यश आपल्या शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे मिळाले हे आपल्या शब्दात व्यक्त करणे हीच आपली गुरुदक्षिणा ठरेल.
*#Thank A Teacher*
सूचना
*" अक्षर मंच "*
*काव्य लेखन स्पर्धा*
*मार्गदर्शक*
*सौ.अनिताताई किरणराव सरनाईक अध्यक्षा शाळा समिती*
*मा.श्री अरुणभाऊ सरनाईक प्राचार्य*
*आयोजक व संयोजक*
*शरद दत्तराव देशमुख तंत्रस्नेही शिक्षक*
*श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम*
********************
*विनामूल्य -सहभाग*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*शाळा बंद शिक्षण.......चालू!* आयोजित....
*शालेयस्तरीय काव्य लेखन स्पर्धा.क्रमांक -१*
*शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे.*
*स्पर्धकाचे कमाल वय १८ व त्याखालिल....कितीही*
*स्पर्धा दिनांक : - २ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२१*
*काव्य लेखनासाठी विषय...*
१) *शिक्षक*
(प्रकार-यमकबद्ध अष्टाक्षरी काव्य)
२) *कलावंत*
(काव्य प्रकाराचे बंधन नाही.परंतू यमकबद्धता आवश्यक आहे.)
३) *मुलगी वाचवा*
(प्रकार-यमकबद्ध अष्टाक्षरी काव्य)
४) *वसुंधरा*
(काव्य प्रकाराचे बंधन नाही.परंतू यमकबद्धता आवश्यक आहे.)
स्पर्धेचे नियम
***************
स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम..........
सारिकाताई खुरसाडे
राधिका बेदरकर ह्या पाहतील
स्पर्धेसाठी, विद्यार्थी व विद्यार्थिनी असे दोन वेगवेगळे गट तसेच इयत्ता ५ ते ७ , इयत्ता ८ ते १० आणि इयत्ता ११ ते १२ असतील.
एक स्पर्धक चार पैकी कोणत्याही एकाच विषयावर कविता लिहून पाठवू शकतो.
( सहभागी-स्पर्धकाने चारही विषयांवर कविता पाठवू नयेत.)
काव्य - स्पर्धा व्हाट्सअॅप ग्रुपवर घेण्यात येणार आहे.*
स्पर्धकांनी आपल्या कविता...
५ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२० दरम्यान..
याच व्हाट्सअप ग्रुप वर वैयक्तिक पाठवायच्या आहेत.
कविता मराठी भाषेतच आणि स्वत:च...स्वत:च्या मनाने स्वरचितच आणि मोबाईलवरच टाईप केलेली असावी.
वहीच्या पानावर लिहून तसेच पीडीएफ करून कविता पाठवू नये. ( कवितेवर कोणाचा अक्षेप आल्यास ,त्याला स्पर्धा-संयोजक जबाबदार असणार नाही.)
कवितेखाली...
कवी किंवा कवयित्रीचे
संपूर्ण नाव..................
( फक्त नाव आणि आडनाव चालणार नाही..तुम्ही तुमचे संपूर्ण नाव लिहा." कुमार-कुमारी-श्री-सौ.-श्रीमती. .जे काय आहे ते स्पष्ट लिहा." )
वर्ग..................
तुकडी....................
संपूर्ण सविस्तर पत्ता................... पिनकोड नंबर सह..
मोबाईल नंबर................
( *कवितेखाली,वरील माहिती सविस्तर लिहिलेली असणे अनिवार्य आहे.तरच ती कविता स्पर्धेसाठी ग्राह्य असेल..अन्यथा सदर कविता स्पर्धेत घेतली जाणार नाही.* याची स्पर्धक ..कवी/कवयित्रिंनी कृपया नोंद घ्यावी.)
तसेच.... हल्ली काही साहित्यचौर्य लोकं आहेत. हे देखील माझ्या लक्षात आल्याने.. जर तुम्ही स्पर्धेत सहभागी होणार असाल तर.. तुम्ही स्पर्धेसाठी पाठविलेली कविता,तुम्ही स्वत:च्या मनाने लिहिल्याचे, तुमच्या स्वाक्षरी सह असल्याचे गृहीत धरण्यात येईल
कविता फक्त १० ते २५ ओळींच्याच दरम्यान असावी. यापेक्षा कमी किंवा जास्त असता कामा नये .
स्पर्धेचा निकाल,
*स्पर्धेचा निकाल, " #Thank A Teacher" या व्हाट्सअप ग्रुप वर , विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांच्या नावांसह प्रकाशित करण्यात येईल.*
*स्पर्धेच्या नियमांत आणि आयोजनात बदल करण्याचा संपूर्ण अधिकार तसेच स्पर्धेचा अंतिम निर्णय..देखिल संस्थापक-अध्यक्षांचाच राहील....* ( कोणत्याही व्यक्तिला यावर हरकत घेता येणार नाही..( *कोणाला किती गुण मिळाले ? तसेच,तुम्हाला किती गुण मिळाले ?....वगैरे कोणतीच शंका-कुशंका विचारण्याचा अधिकार असणार नाही
*पुरूष - कवी व महिला - कवयित्री ..या दोन्ही गटात व कवितेच्या चारही विषयांसाठी संस्थेकडून, प्रत्येकी ..." सर्वोत्कृष्ट काव्य लेखन " असे तीन विजेते , तसेच " उत्कृष्ट काव्य लेखन " ,असे नामांकन करून .सर्व कवी-कवयित्रींना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल "*
नवोदित कवी-कवयित्रींसाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे.....................कवी-कवयित्री च्या साहित्यास , संस्थेच्या वतीने #Thank A Teacher काव्य - लेखन " हा " पुरस्कार " देण्यात येईल.
स्पर्धकांनी आपली कविता याच व्हाट्सअप ग्रुप वर पाठवावी खालील लोगो द्वारे व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होता येईल
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon