DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शिक्षक दिन प्रश्नमंजुषा Teacher's Day Quiz

शिक्षक दिन प्रश्नमंजुषा Teacher's Day Quiz 


Teacher's Day Quiz


              भारतरत्न         
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
     जन्म : ५ सप्टेंबर १८८८
(तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत)
 मृत्यू : १७ एप्रिल १९७५                                  २ रे भारतीय राष्ट्रपती
कार्यकाळ : १३ मे १९६२ – १३ मे १९६७
मागील : राजेंद्रप्रसाद
पुढील : झाकीर हुसेन
       भारतीय उपराष्ट्रपती
कार्यकाळ : १९५२ – १९६२
   
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी : सिवाकामुअम्मा
अपत्ये : पाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल
व्यवसाय राजनीति तत्त्वज्ञ तज्ञ प्राध्यापक
धर्म : वेदान्त (हिंदू)

सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ होते. डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन  हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपतीच आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ  त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.

राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.

🎖 पुरस्कार

१९५४ : 'भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस…. 

डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला .

त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूत्तनी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.

मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.

1931साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.

1952साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.

1957च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले. त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

‘शिक्षक’ भावी पिढीचा शिल्पकार…

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.

आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शिक्षक दिन अर्थात चिंतनाचा दिन
समाज व शिक्षक यांचे नाते अतूट आहे. तसेच ते अमूल्यही आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील परंपरेमध्ये समाजऋण फेडण्यासाठीचाही उल्लेख आढळतो. शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक. राष्ट्राची ध्येय-धोरणे बळकट करण्यासाठी व देशाला अधिक बलशाली बनवण्यासाठी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे आखली जातात त्याची रूजवणं करणारा, ती मूल्ये वृध्दिंगत होण्यासाठी संस्कार करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. राष्ट्रउभारणीत शिक्षण व शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे. अशावेळी एखाद्या राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा मानला जातो. समाजातील अनेक पिढय़ा त्यांच्या हाताखालून जात असतात. या पिढय़ांना माणूस म्हणून घडवताना राष्ट्रीय चारित्र्यही घडणे अभिप्रेत असते. महात्मा गांधीजींना शिक्षणांची व्याख्या करताना हेच अभिप्रेत होते व ते कालातीतही आहे.

शिक्षकांनी, शिक्षक हा पेशा न मानता ते व्रत समजावे व घेतला वसा टाकू नये, ऊतू नये, मातू तर अजिबात नये. कालौघात शिक्षणक्षेत्रातील आवाहने व शिक्षकांविषयीच्या संकल्पना बदलत आहेत. गुरू, गुरुजी, मास्तर, बाई, सर, ताई आणि आता मॅडम अशी बिरूदे शिक्षकांसाठी पुढे आली आहेत. शिक्षक व विद्यार्थी यातील अंतर कमी झाले आहे. शिक्षकांविषयीची आदरुक्त भीती आता अभावानेच आढळते. गुरुंविषयीचा अभिमान, आदर असणारी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वेही तशीच कमीच होत आहेत. शिक्षकांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. गुरुची कामं आता यंत्र करत आहे. शाळा, महाविद्यालय ही संकल्पना भविष्यात लयालाही जाईल. ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन पदवीही मिळेल. या सगळ्या गदारोळात माणसाच्या सामाजिकीकरण प्रक्रिया मात्र होणार नाही. सहवेदना, सहकार्य, सहानुभूती, त्याग, सोसणे या मानवी भावभावनांचे विकसीकरण कदाचित होणार नाही. सवंगडय़ा सोबत, एका विशिष्टवेळी, विशिष्ट इमारतीत प्रत्यक्ष प्रसंग घडत असताना, प्रत्यक्ष जीवनानुभवातून आपण जे अनुकरणाने, अवलोकनाने, अनुभवातून शिकतो त्याचे काय? हा प्रश्न बाकी असेल. यादृष्टीने विचार करता, मानवाने यंत्रे निर्माण केली. विकसित केली. हीच यंत्रे माणसाची जागा घेत आहेत. पण शिक्षण क्षेत्रात ई-लर्निगची साधने हा शिक्षकांसाठीचा पर्याय होऊ शकत नाही. संस्कार, प्रेम, शिस्त, सृजनांचे रूजवण करण्याचे काम यंत्रे करू शकत नाहीत. हेच खरे.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना पारंपरिक शिक्षण व आधुनिक शिक्षण असे दोन प्रवाह दिसतात. जीवन कौशल्यावर आधारित किमान कौशल्ये प्राप्त करून देणारे शिक्षण हे भविष्यात उपोगी पडणारे आहे. कुशल मनुष्यबळ हीच आपली आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती असणार आहे. अगदी आधुनिक पद्धतीच्या शेतीपासून ते अवकाश शास्त्रापर्यंतच तंत्रज्ञानाचा शिक्षणात अंतर्भाव करून राष्ट्राला घडवणारी, राष्ट्राला स्वतंत्र वेगळी ओळख प्राप्त करून देणारी पिढी निर्माण करण्याचे मोठे आव्हान मात्र आपल्या पुढे आहे. शिक्षणाने प्रगती होते, समाज विकसित होतो, देश प्रगत होतो हे खरे; पण आपण मिळवलेले ज्ञान, कौशल्ये हे आपल्या ‘स्व’ सुखापुरते मर्यादित न ठेवता. समाजाभिमुख व्हावे आपण कार्य करतो. समाजासाठी लढतो, उभे राहतो, समाजाला योगदानाच्या रूपात काही देऊ शकतो तेव्हाच हे शक्य आहे व हीच मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे अवघड काम मात्र शिक्षकांना करायचे आहे. धर्म, प्रांत, जात, देश या मर्यादा ओलांडून गेल्याशिवाय ग्लोबलाझेशनच्या खर्‍या अर्थापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. म्हणून सर्व थरातील शिक्षणाला व शिक्षकांना आज महत्त्व आहे. माझ्यामधले ‘दि बेस्ट’ देण्याची तळमळ असणारे शिक्षकच हाडाचे शिक्षक ठरतात. समाजभिमुखी पिढी घडवताना विद्यार्थ्यांमध्ये ग्रासलेल्या प्लसची जाणीव, सामर्थ्याची ओळख करून देण्याचे काम होणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला अभिप्रेत असलेला शिक्षणातून सर्वागिण विकास घडणार आहे. ‘शिक्षक दिन’ म्हणूनच सगळ्यांसाठी चिंतनाचा दिन ठरावा.
मी देशासाठी काय करू शकतो. देशाला काय देऊ शकतो, माझ्या जन्माची सार्थकता कशात आहे, ते इप्सित साध्य करण्याच्या दृष्टीने एक शिक्षक म्हणून आपण कार्यरत असावे. आज काळ बदलला आहे. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. शिक्षणतज्ज्ञांइतकेच या शिक्षण प्रक्रियेत पालकांनाही महत्त्व आले आहे. समाजाची गरज, विद्यार्थी घडवणे, पालकांची अपेक्षा, आपल्या व्यवसायाची पवित्रता जपणे, प्रतिमा जपणे या सगळ्याचा मेळ घालताना आपले ज्ञानही अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. या सगळ्याचे संतुलन साधत ह्या व्रताची अवघड वाटचाल करावायची आहे. शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा...!

यानिमित्तानं जाणून घेऊया त्यांचे अनमोल आणि प्रेरणादायी विचार...
 
1. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवतो, तो खरा शिक्षक.

2.  मानवतेच्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन चांगली व्यवस्था आणि स्वातंत्र्य दोन्ही अबाधित राहील.

3. पुस्तकांच्या वाचनानं आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरे सुख लाभते.

7. कवी धर्मामध्ये कोणत्याही निश्चित स्वरुपातील सिद्धांतासाठी कोणतीही जागा नसते.

8. मानव दानव बनणं, हा त्याचा पराभव... मानव महामानव बनणं, हा त्याचा चमत्कार... आणि मनुष्य मानव होणे, हा त्याचा विजय...

9.  कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यत खरे नसते, जोपर्यंत त्या विचाराचं स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. सत्याच्या शोधात असताना कोणत्याही धार्मिक श्रद्धा किंवाछ राजकीय सिद्धांतांमध्ये बाधा आणू नये. 

10. धर्माविना एखादी व्यक्ती लगाम नसलेल्या घोड्याप्रमाणे असतो.

शिक्षक दिन प्रश्नमंजुषा Teacher's Day Quiz 

#Thank A teacher

#Dr. Sarvepalli Radhakrishnan

#Radhakrishnan .

 


मराठी व्याकरण -  नवरस ओळखा या घटकावर आधरित ऑनलाइन चाचणी  चाचणी सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

इंग्रजी व्याकरणावर आधरित ऑनलाइन चाचणी  चाचणी सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 





महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अकोला जिल्हा Akola District Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अमरावती  जिल्हा Amravati District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा औरंगाबाद जिल्हा Aurangabad District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा अहमदनगर जिल्हा Ahemadnagar District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा उस्मानाबाद  जिल्हा Osmanabad District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा कोल्हापूर  जिल्हा Kolhapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा गडचिरोली  जिल्हा Gadchiroli District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा गोंदिया जिल्हा Gondia District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा चंद्रपूर जिल्हा Chandrapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जळगाव  जिल्हा Jalgaon District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा ठाणे  जिल्हा Thane District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नागपूर जिल्हा Nagpur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नंदुरबार जिल्हा Nandurbar District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नांदेड जिल्हा Nanded  District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  परभणी जिल्हा  Parbhani District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  पालघर जिल्हा  Palghar District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  पुणे  जिल्हा  Pune District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  धुळे  जिल्हा  Dhule District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  बीड जिल्हा Beed District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  बुलढाणा जिल्हा Buldhana  District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  भंडारा जिल्हा Bhandara District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  मुंबई शहर  Mumbai City District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  मुंबई उपनगर Mumbai Suburban District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  यवतमाळ  Yavatmal District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  रत्नागिरी  Ratnagiri District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  रायगड  Raigad District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  लातूर Latur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  वर्धा Wardha District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  वाशीम Washim District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सातारा Satara  District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सांगली  Sangli  District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सिंधुदुर्ग Sindhudurg   District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  हिंगोली Hingoli District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
Unknown
admin
September 5, 2021 at 4:56 PM ×

शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर.

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon