टिलीमिली
टिलीमिली या कार्यक्रमाचे दुसरे सत्र इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्या साठी सह्यान्द्री या वाहिनीवर दिनांक ०८ मार्च, ते ११ मार्च,२०२१पर्यंतचे नियोजन
टिलीमिली या कार्यक्रमाचे दुसरे सत्र इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्या साठी सह्यान्द्री या वाहिनीवर दिनांक ०८ मार्च, ते ११ मार्च,२०२१पर्यंतचे नियोजन
टिलीमिली या कार्यक्रमाचे दुसरे सत्र इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी सह्यान्द्री या वाहिनीवर दिनांक ०८ मार्च, ते ११ मार्च,२०२१पर्यंतचे नियोजन
इयता ५ वी ते ८ वी साठीचे दिनांक ०८ मार्च, ते ११ मार्च,२०२१पर्यंतचे नियोजन
======================== इयत्ता वेळ ======================== इयत्ता ५ वी सकळी ११.३० ते दुपारी १२.३० --------------------------------------- इयत्ता ६ वी सकळी १०.०० ते दुपारी ११.०० ---------------------------------------- इयत्ता ७ वी सकळी ०९.०० ते दुपारी १०.०० ---------------------------------------- इयत्ता ८ वी सकळी ७.३० ते दुपारी ०८.३० ----------------------------------------
टिलिमिली - या मालिकेचे प्रसारण वरील नियोजनाप्रमाणे रविवार वगळून दररोज करण्यात येणार आहे वर दर्शविलेल्या प्रत्येक तासात त्या त्या इयत्तेचे २५ मिनिटाचे दोन पाठ होतील मध्ये ५ मिनिटांची विश्रांती असेल.
कोणत्या केबलवरवर / सेट-टॉप-बॉक्स वर पहाल सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली ही मालिका,टाटा स्काय वर १२७४, एअरटेल वर ५४८, डिश टीव्ही १२२९,व्हिडिओकॉन ७६९,आणि आणि डीडी फ्री डिश वर ५२५ या क्रमांकाच्या चैनल वर पाहता येतील. टिलिमिली या मालिके विषयी माहिती - पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या मालिकेच्या दुसऱ्या सत्राचे भाग सुरू झालेले आहेत कोरोना प्रादुर्भावाचे नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे गेल्या वर्षी २३ मार्च पासून राज्यातल्या शाळा बंद झाल्या पण शिक्षण थांबलं नाही तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग झालेत डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाची ही गंगा वाहती ठेवण्यात आली पण त्यातही काही तांत्रिक अडचणी आल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुण्याच्या एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने दूरदर्शनच्या वाहिनीवरून दिली ही दैनंदिन शैक्षणिक मालिका सुरू केली. टीलिमिली च्या दुसऱ्या सत्रात कायकाय आहे विशेष.... टीलिमिली मालिकेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयाची मराठी माध्यमातील शिक्षण सुरू झालेले आहे दुसऱ्या सत्राच्या पाठावर आणि त्यातील संकल्पना वर आधारित या मालिकेत कुठेही मुलांना कंटाळा येणार नाही यासाठी सलग व्याख्याने नाहीत घरी किंवा घराच्या परिसरातच बघता येतील अशा कृतीनिष्ट उपक्रमातून मुलांना शैक्षणिक अनुभव दिले जाऊ शकतात तेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातली उत्साही शिक्षक,अभ्यासू पालक,ताई-दादा,अक्का स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात हेही टिलीमिली मालिका जाताजाता दाखवत राहते टिलीमिली मालिका कधीपर्यंत ........? रविवार वगळता इतर सर्व दिवस सकाळच्या वेळेत ही मालिका पाहता येणार आहे कृतीनिष्ठा उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने व अमराठी माध्यमात शिकणाऱ्या पण मराठी समजणार्या विद्यार्थ्यांना ही मालिका उपयुक्त ठरेल त्यामुळे या मालिकेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आव्हान एमकेसीएल केले आहे
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon