महावितरण कंपनीने मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.तसेच ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही,अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविता येणार आहे.
कसे पाठवाल मीटर रीडिंग ?
रिडींगच्या निश्चित तारखेच्या एक दिवस आधी महावितरण कंपनी कडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची
‘एसएमएस’द्वारे
दरमहा विनंती
करण्यात येईल.हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून
मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल.
SMS द्वारे कसे पाठवाल मीटर रीडिंग ?
ग्राहकांनी
स्वतःचा मोबाईल क्रमांक हा मीटर ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक
आहे.
वीज
ग्राहकांनी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> असा
‘एसएमएस’ 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे.नोंदणीकृत
मोबाईलवरच मीटर रिडींग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त होईल.
आता उदाहरण बघू - १२ अंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास आणि
मीटरचे KWH रिडींग ५५७० असे असल्यास MREAD
123456789012 5570 या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon