अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रश्न मंजुषा सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त
ज्ञानयात्री तंत्रस्नेही संकेतस्थळाचा
उपक्रम
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : प्रश्नमंजुषा
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Quiz
9️⃣8️⃣ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवा
विशेष प्रश्न मंजुषा
“अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा”
╔═══════════════════╗
उत्सव आझादी का गौरव मराठी भाषेचा
╚═══════════════════╝
माझा मराठीची बोलू कौतुके।
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
-संत ज्ञानेश्वर
अशा माय मराठीच्या साहित्याचा महाकुंभ सारस्वतांचा
मेळा म्हणून ज्याला संबोधले जाते अशा ९८ व्या सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी ताल कटोरा स्टेडियम दिल्लीच्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे
या उत्सवाचे औचित्य साधून मराठी साहित्य संमेलने, यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवा
आता पर्यंत झालेली मराठी साहित्य संमेलने,संमेलन वर्ष.स्थळ ,लाभलेले अध्यक्ष,संपूर्ण माहिती असलेली pdf याच लिंक वरून उद्या Download नक्की करा या ओळीला स्पर्श करा
संमेलन इतिहास -
१८६५
साली न्या.महादेव गोविंद रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा
घेतलेला असता . त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे त्याना
आढळले ग्रंथ
प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी
गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादींच्या सहकार्याने सन १८७८ च्या मे महिन्यात
ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले.
त्या
संबंधीचे आवाहन ज्ञान प्रकाश मध्ये दि. ०७ फेब्रुवारी, १८७८ मधे प्रसिद्ध झाले आणि या
आवाहनानुसार ११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या
हिराबागेत मराठी
ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. या
संमेलनला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. पहिले अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.महादेव गोविंद रानडे यांनीच
भूषविले आहे .
दुसरे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (ग्रंथकार संमेलन) सन १८८५ साली दि. मे
२१ १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे
सार्वजनिक सभेच्या दाणे आळी, बुधवार पेठ , पुणे जोशी हॉलमध्ये भरले होते. या संमेलनाला
पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली
होती.
या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे
ग्रंथकार संमेलन सन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले.लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले
सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते.या संमेलनाचा २३ मे च्या केसरीत त्रोटक
वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ
चवथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८
मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी
सदाशिव पेठेत नागनाथ पारा जवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. चवथे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा
जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले.
चवथे संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर
होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी
संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस चांगलेच गाजले.
CLICK HERE
मराठीला
अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा.रंगनाथ पठारे समितीची
स्थापना झाली.मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळावा, यासाठी
प्रयत्न करण्यास राज्य सरकारने मध्यंतरी समिती नेमली. तिचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे
होते अभिजात
भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे.
केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.भाषा
प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे,भाषेला
स्वतःचे स्वयंभूपण असावेत, प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम
असावा
मराठी
भाषेतील ग्रंथ धनाचे पुरावे बाराव्या – तेराव्या शतकापासून आढळतात.
‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या
ग्रंथांचा आधार दाखविला जातो.
“अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार
मोठा उत्प्रेरक म्हणून काम करू शकतो.
अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी
पुढीलप्रमाणे फायदे आहेत :
मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह
करणे इ.
भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे
महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना
सशक्त करणे.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा
साऱ्यांना भरीव मदत करणे. इ.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवा
विशेष प्रश्न मंजुषा
● या आणि आशा प्रकारच्या जाहिरातीसाठी / रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
CLICK HERE
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon