DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

विलासराव देशमुखांचा 'तो' मोबाईल नंबर आजही सुरु, एकदा नक्की हा नंबर फिरवून पाहा..

राजकारणातील राजहंस म्हणून ओळख असलेले विलासराव देशमुख. विलासराव देशमुख कितीही कामात असले तरीही विलासराव देशमुख हे त्यांना आलेले फोन स्वतः उचलायचे.

     राजकारणातील राजहंस म्हणून ओळख असलेले विलासराव देशमुख. विलासराव देशमुख कितीही कामात असले तरीही विलासराव देशमुख हे त्यांना आलेले फोन स्वतः उचलायचे. देशमुख यांना नेहमीच सतत लोकांमध्ये राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे कायमच आवडायचे. सर्वांच्या मनात त्यांनी महत्वाचे स्थान निर्माण केलं होतं. त्याच्या  याच एका सवयीमुळे त्यांच्याशी अनेकजण थेट संवाद साधत. कुणीही विलासराव देशमुख यांना  फोन केला आणि त्यांना उतर दिले नाही असं कधी झालं नाही. विलासराव देशमुख एखाद्या वेळी कामात खूप व्यस्त असतील तर त्यांना ते  शांततेत  फोन करत असत. 

           विलासराव यांचा मोबाईल नंबर आजही कित्येकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. लातूर मधली आणि आसपासच्या ग्रामीण भागातील अनेक मंडळी विलासराव देशमुख यांना थेट फोन करत संपर्क ठेवत असत.विलासरावां बद्दलचं लोकांच्या मनात असणारं हे प्रेम पाहून त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवण्यात आलाय. या नंबरवर तुम्ही कधीही फोन करु शकता. फोन लावल्यानंतर तुमच्याशी विलासराव बोलत नाही पण, त्यांची गाजलेली भाषणे तुम्हाला ऐकायला जरूर मिळतील विलासराव प्रत्येकां सोबतच शांतपणे न रागवता संवाद साधायचे. एके दिवशी लातूरच्या जीप चालकाला वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी थेट विलासरावांना फोन केला.त्यावेळेस विलासरावांच्या विनंतीनंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना सोडून दिले. असे एक ना अनेक किस्से आहेत. इतका मनाचा निरागस नेता महाराष्ट्राने गमावला याचे सर्वांनाच दुःख होत आहे. मात्र आजही प्रत्येकांच्या मनामनामध्ये विलासराव देशमुख यांचे अढळ आहे.

      त्यांना मानाचा मुजरा !

आदरणीय  स्व.विलासराव यांचा हा आहे  मोबाईल नंबर आहे 

९८२११२५०००


हे ही वाचा 

रस्ते सुरक्षा महिन्या अंतर्गत शिक्षकांना रस्ते सुरक्षा संदर्भात Online सत्र 

रस्ते सुरक्षा महिन्या अंतर्गत राज्यातील सर्व  शिक्षकांसाठी आयोजित  रस्ता सुरक्षा संदर्भातील  Online सत्रा बाबत मा.संचालक SCERT,पुणे यांचे पत्र Download करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon