Also read 👇
प्रति, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व
माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व, प्रशासन अधिकारी मनपा सर्व |
विषय : शाळांमध्ये दि. 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी
"एक तारीख एक तास श्रमदान" हा उपक्रम राबविणेबाबत .... |
सदर कार्यक्रमाचे फोटो 👆 या ट्रॅकर वर दि ०१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
अपलोड करावे.
|
दिनांक १४ मार्च २०२३ पासून होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनासंदर्भात करावयाची कार्यवाही महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक १३ मार्च २०२३ Maharashtra Govt Strike Circular
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक संघटना १५२३/प्र.क्र.३६/१६-अ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- १३ एप्रिल २०२३
वाचा :- १. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांकः संघटना १५२३/प्र.क्र.३६/१६-अ, दि. १३.०३.२३.
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक संघटना १५२२/प्र.क्र.३६/१६-अ, दि. २८.०३.२०२३.
३. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, मुंबई यांचे दिनांक ३१.०३.२०२३ रोजीचे पत्र ४. राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र यांचे
दि.०३.०४.२०२३ रोजीचे पत्र.
प्रस्तावना :-
http://www.dnyanyatritantrasnehi.com
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या दि. १४ मार्च ते २० मार्च, २०२३ या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी/अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यांची अनुपस्थिती संदर्भ क्र. २ येथील दि. २८ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च २०२३ ते २० मार्च, २०२३ या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले होते, त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पूर्वोदाहरण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा ऐवजी "अर्जित रजा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०४१३१६१२५१६९०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
ASHOK MAHADEO CHEMTE
(अ. म. चेमटे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
दिनांक २३ व २४ फेब्रुवारी २०२२ या दोन दिवसाच्या राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलन संदर्भात करावयाची कार्यवाही महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक २२ फेब्रुवारी २०२२
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon