राज्य विज्ञान शिक्षण संस्था
प्रादेशिक विद्या प्राधिकरण
रविनगर, नागपूर
क्रमांक सविशिमं Inspire -MANAK DLEPC-2023-24/10 2025
दिनांक 07/02/2025 10/02/2025
विषय:- Inspire Award-MANAK योजना जिल्हास्तरीय स्पर्धा (DLEPC)-2023-24चे आयोजन करणेबाबत.
संदर्भ:- मा. नितीन मौर्य, Scientist & NIF Coordinator Inspire -MANAK अहमदाबाद यांचा ई-मेल संदेश दिनांक 23 जानेवारी 2025.
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, Inspire Award-MANAK योजना सत्र 2023-24 चे महाराष्ट्रातील एकूण 2149 विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये निर्देश प्राप्त आहेत. ज्या जिल्ह्यातील निवडप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, अशा 3 ते 4 जिल्ह्यांना एकत्रित करून त्यापैकी एका जिल्ह्यास सदर प्रदर्शनीच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात येईल. सद्यस्थितीत इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षेचा काळ असल्यामुळे, सदर Inspire MANAK जिल्हास्तरीय प्रदर्शनी उपरोक्त लेखी परीक्षेनंतर मार्च एप्रिल 2025 मध्ये आयोजित करण्याचा मानस आहे. याबाबत निश्चित तारखा जिल्ह्यांना यथाशिघ्र कळविण्यात येतील.
तरी आपण आपल्या जिल्ह्यातील निवडप्राप्त विद्यार्थ्यांना व संबंधित शाळांना त्यांच्या Prototype सह तयारीत राहणेबाबत कळवावे.
सहपत्र:- 1. संदर्भिय पत्र. 2. निवडप्राप्त विद्यार्थी यादी
CIRCULAR PDF COPY LINK
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर
प्रतिलिपी-
1. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना माहितीस्तव सविनय
सादर
2. मा. संचालक, NIF, अहमदाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर
3. मा. शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग यांना माहितीस्तव समादराने सादर
4. मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व यांना माहितीस्तव समादराने सादर
Sub: INSPIRE-MANAK-District & State Level Exhibition (DLEPC/SLEPC) 2023-24
Also Read 👇
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर
(राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था)
नागपूर
क्र. प्राविप्रा/प्रशा-३/३१४/२०२४
दिनांक : 02/07/2024
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) जि.प. (सर्व)
२) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
विषयः- INSPIRE Award MANAK योजना सत्र २०२३-२४ करीता Online नामांकने सादर करणेबाबत.
संदर्भः-
१) मा. नमिता गुप्ता HEAD (INSPIRE MANAK) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.DST/ INSPIRE- MANAK/NOMINATIONS/2024-25
विषय उपरोक्त संदर्भाकीत विषयावे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत सन २०२४-२४ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणा-या (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स
INSPIRE Award MANAK Yojana Online Registration
या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत. या करीता नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२४ पासून सुरू झाले असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे.
सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टिने कार्यवाही करावी. तसेच जिल्हयातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिका-यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Online
सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्हयाच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना कळविण्यात येणार आहे. त्याकरीता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्हयातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.
सहपत्र: संदर्भीय पत्र
(डॉ. हर्षलता बुराडे)
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर.
Also Read 👇
प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर
क्रमांक:राविशिसं/ Inspire Award / DLEPC-2022-231661/2023
दिनांक : 01/12/2023
प्रति,
1. मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद, सर्व 2. मा. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, दक्षिण, उत्तर )
विषय:- Inspire Award-MANAK योजना जिल्हास्तरीय स्पर्धा (DLEPC)-2022-23चे आयोजन करणेबाबत
संदर्भ:- 1. मा. महेश पटेल, Scientist 'G' NIF, अहमदाबाद यांचे पत्र क्र. 142664 दिनांक 30 नोव्हेंबर 2023.
उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, Inspire Award-MANAK योजना सत्र 2022-23 चे महाराष्ट्रातील एकूण 1649 विद्याथ्र्यांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये निर्देश प्राप्त आहेत. ज्या जिल्ह्यातील निवडप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, अशा 3 ते 4 जिल्ह्यांना एकत्रित करून त्यापैकी एका जिल्ह्यास सदर प्रदर्शनीच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात येईल. याबाबत आपणास लवकरच कळविण्यात येईल. तरी आपण आपल्या जिल्ह्यातील निवडप्राप्त विद्यार्थ्यांना व संबंधित शाळांना त्यांच्या
Prototype सह तयारीत राहणेबाबत कळवावे.
(डॉ. राधा अतकरी)
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण ) रविनगर, नागपूर.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर ४४०००१ दूरध्वनी क्र. FAX ०७१२-२५६२९८९ क्रमांक: राविशिसं/ INSPIREAward नामांकने
2023-24/277/1/2023 ई.मेल directorsise@gmail.com दिनांक : 05/06/2023 |
इंस्पायर अवार्ड मानक बाबत Inspire Awards MANAK योजना सत्र २०२३ - २४ करिता Online नामांकने सादर करणे बाबत
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांचे परिपत्रक pdf
Download करण्यासाठी
Online नामांकने सादर करणेसाठी Website
CLICK HERE
Also Read -
२४ फेब्रुवारी २०२२
वेळ - १०: ३०
इंस्पायर अवार्ड मानक बाबत Inspire Awards Manak योजना सत्र २०२१ - २२ करिता Online नामांकने सादर करणे बाबत
मागील सर्व सामान्यज्ञान चाचणी सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
मागील सर्व इंग्रजी व्याकरण चाचणी सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
Tag INSPIREAWARD
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon