दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचा कल जाणून घेण्यासाठी मागील चार वर्षापासून सुरू असलेली कलचाचणी यंदा बंद केली जाणार असल्याने याला पर्याय म्हणून शिक्षण विभाग योग्यता चाचणी Ability Test घेण्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात असल्याचे समजते ही चाचणी दहावीच्या मुख्य लेखी परीक्षेनंतर ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेली आहे
अशी होईल चाचणी
- दहावीच्या मुख्य लेखी परीक्षेनंतर राज्यभरात एका दिवशी ऑफलाईन पद्धतीने होणार
- विद्यार्थ्याला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल
- आवड हुशारी आणि व्यक्तीमत्वाच्या आधारे होणार चाचणी
- दुसऱ्या दिवशी निकालाच्या आधारे समुपदेशककाद्वारे मार्गदर्शन केले जाईल
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon