DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

कोव्हिड १९ काळातील अभ्यासमाला
कोव्हिड – १९ काळातील अभ्यासमाला

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे(अभ्यासमाला) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार,विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

सध्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्या आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं चालू असेलच! आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे. म्हणूनच या लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल.त्यासाठी खालील लिंकला टच करा. https://bit.ly/dikshadownload

त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या सुचनेतील विषयनिहाय पाठनिहाय लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे.

चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास !

यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

Stay home, stay safe!

अभ्यासासाठी शुभेच्छा!

आपला,
श्री. दिनकर पाटील.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे


Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon