Ekal Mahila Dhoran
ekal mahila dhoranasathi masuda samiti
gathit
Drafting committee formed for single women policy
एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती
गठीत करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन पुरकपत्रक क्रमांक- संकीर्ण-२०२६/प्र.क्र.६३/का-०३
मंत्रालय, मुंबई
दिनांक- ३० सप्टेंबर, २०२६
वाचा:- महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.६३/का-०३, दि. २२.०५.२०२६.
शासन पुरकपत्रक :-
एकल महिलांसाठी सर्वंकष धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी आयुक्त, महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचे अधिकारी, एकल महिलांच्याबाबतीत कार्यरत राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींचा समावेश असणारी मसुदा समिती दि. २२.०५.२०२६ शासन निर्णयान्वये गठित करण्यात आली आहे.
२. सदर शासन निर्णयान्वये गठीत समितीमध्ये खालील नमूद अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यास या पुरकपत्रकान्वये मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र. नाव व पदनाम समितीतील पद
१. श्रीम. वर्षा परचुरे
अशासकीय सदस्य
२. प्रा. उत्तरा बचुटे
अशासकीय सदस्य
३. अॅङ प्रिया राघवेंद्र भारस्वाडकर
अशासकीय सदस्य
४. श्रीम. मीरा अरविंद कडबे
अशासकीय सदस्य
५. अॅड. मिनल गणपतराव साठे
अशासकीय सदस्य
६. सौ. भावना अनिल नखाते
अशासकीय सदस्य
३. सदर शासन पुरकपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२६०९३०१६००१४७९३० असा आहे. सदर शासन पुरकपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon