DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

HRA Circular भाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध

HRA CIRCULAR 

gharbhade bhatta tab shalarthmadhye upalabdha House Rent Allowance tab available in Shalaarth

HRA PARIPATRAK


HRA SHALARATH TAB AVAILABLE 

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय,पुणे

Digital Sign Date

क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/घरभाडे भत्ता /प्रति,

श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड (शालार्थ सिस्टीम) महाआयटी, मुंबई

      विषय- घरभाडे भत्ता टॅब शालार्थमध्ये उपलब्ध करून देणेबाबत.

संदर्भ - संचालनालयाचे कपात सूचनेचे संदर्भात दिलेले उत्तर पत्र क्र. अंदाज-२०३/कपासू/११४५/२०६१७६५ दिनांक ५/८/२०२६.

उपरोक्त विषयान्वये राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील कर्मचा-यांना माहे जूलै २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम खालीलप्रमाणे १७ जिल्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना अदा केलेली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि गडचिरोली या १७ जिल्हयांनी माहे जूलै २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे सदर जिल्हयांनी वरील कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करू नये.

तथापि माहे जूलै २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांचे घरभाडे भत्ता फरक अदा न केलेले जिल्हे- ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर. (असे एकूण १७ जिल्हे) करीता आपल्या स्तरावर शालार्थ प्रणालीमध्ये माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर २०२६ मध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.

Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 11-08-2026 22:09:07

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत- आवश्यक कार्यवाहीसाठी-

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, प्राथमिक संबधित सर्व.

२/- यांना कळविण्यात येते की, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या १७ जिल्हयातील अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक यांनी माहे जूलै २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या महिन्याच्या कालावधीतील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना घरभाडे भत्ता फरकाची रक्कम माहे ऑगस्ट २०२६ मध्ये अदा करावी. सदर जिल्हयांनी उपरोक्त कालावधीतील घरभाडे फरकाची रक्कम यापूर्वी अदा न केल्याची खात्री करून अदा करावी. उर्वरित १७ जिल्हयांनी यापूर्वीच सदरील घरभाडे भत्ता फरक रक्कम अदा केल्याबाबतचा अहवाल संचालनालयास सादर केलेला आहे.


gharbhade bhatta tab shalarthmadhye upalabdha House Rent Allowance tab available in Shalaarth

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक



Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon