DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

CM Vidyarthi Vigyan Wari Upkram GR मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" उपक्रम सुरू करणेबाबत शासन निर्णय

CM Vidyarthi Vigyan Wari Upkram GR


"mukhyamantri vidyarthi vidnyan vari" ha upkram suru karanebabat

Regarding the launch of the initiative "Chief Minister's Student Science Tour"

राज्य विज्ञान शिक्षण संस्था
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)
नागपूर

जा.क्र.राविशिसं/मुविविवा/
/ २०२६

दिनांक: ३०/०७/२०२६


विषयः "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" हा उपक्रम सुरु करणेबाबत...

संदर्भ:
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१४६ (ई-११८०५१६)/एसडी-१ दि. ६ मे २०२६
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१४६ (ई-११८०५१६)/एसडी-१ यांचे पत्र दि. १७/०७/२०२६
३) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंवप्रपम/विवि/मु.वि.वा/२०२६/२०४६५०६, दि.२८/०७/२०२६
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणितातील सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी NCERT, नवी दिल्ली मार्फत विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग "राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन" हा आहे. तालुका, जिल्हा ते राज्य पातळीवरील स्पर्धेतील विजेते विद्यार्थी राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवडले जातात. महाराष्ट्रात राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर या प्रदर्शनांचा समन्वय करते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार, विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनवृत्ती आणि प्रयोगशील शिक्षण वाढवण्यासाठी संदर्भ क्र. १ नुसार "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांकरिता खालीलप्रमाणे विविध अभ्यास दौरे/भेटी आयोजित केल्या जाणार आहेत.

अ क्र

स्तर

स्थळ

विद्यार्थी संख्या

शिक्षक / अधिकारी

खर्च मर्यादा

तालुकास्तरावरील विजेते विद्यार्थी

विभागीय सायन्स सेंटर (नागपूर, मुंबई, पुणे) येथे भेट

२१४८

प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त ०६ (सहा) विद्यार्थी (प्रत्येक गटातील एक उत्कृष्ट विद्यार्थी याप्रमाणे)

२० (विज्ञान पर्यवेक्षक/विज्ञान शिक्षक)

रू.२००००/-प्रती व्यक्ती

जिल्हास्तरावरील उत्कृष्ट विद्यार्थी

इस्रो (ISRO) केंद्र, बंगळूरू भेट

प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त ०६ (सहा) विद्यार्थी (प्रत्येक गटातील एक उत्कृष्ट विद्यार्थी याप्रमाणे)

८ (विज्ञान पर्यवेक्षक/विज्ञान शिक्षक)

रु.३५०००/-प्रती व्यक्ती


संदर्भ क्र. १ व २ नुसार राज्यातील तालुकास्तर व जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) तरतूद करून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार याबाबत आवश्यक कार्यवाहीकरिता सर्व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद तसेच मा. आयुक्त बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई यांना संदर्भिय पत्र क्र. ३ नुसार मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांनी कळविले आहे.
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमधून शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विद्यार्थी निवड करण्यासाठी समिती गठीत करावयाच्या असून त्यास अनुसरून तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांची निवड व भेटीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक तरतूद मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडून जिल्हा योजनेत (DPDC) उपलब्ध करून घेण्याविषयी आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

सहपत्रः संदर्भिय पत्र

Digitally signed by Rajkumar Pralhadrao Awasare Date: 31-07-2026 11:21:31

(डॉ. राजकुमार अवसरे)
संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण)
रवी नगर, नागपूर
प्रतिलिपी माहितीस्तव सविनय सादरः
१) मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे
३) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
४) मा. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग)
५) मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
इ-मेल directorsise@gmail.com
दूरध्वनी क्र.: ०७१२-२५६२९८१/ २५६२९८०
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जि.प. (सर्व)
२) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/ दक्षिण/पश्चिम)
३) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)



"mukhyamantri vidyarthi vidnyan vari" ha upkram rabavinyakarita talukastar v jilhastar samiti gatheet karanebabat....

Regarding the formation of taluka-level and district-level committees to implement the initiative "Chief Minister's Student Science Wari"....

राज्य विज्ञान शिक्षण संस्था
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)

जा.क्र.राविशिर्स/मुविविवा/
/ २०२६
दिनांक: ३०/०७/२०२६

विषयः "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" हा उपक्रम राबविण्याकरिता तालुकास्तर व जिल्हास्तर समिती गठीत करणेबाबत....
संदर्भ:
१) या कार्यालयाचे यांचे पत्र जा.क्र. राविशिसं/मुविवि या/१/२४१६०५८/२०२६, दि.४.०६.२०२६
२) शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र. क्र. १४६ (ई-११८०५१६) / एसडी-१, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन, दिनांक. ०६/०५/२०२६.
३) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंवप्रपम/विवि/विवा कार्यवाही/२०२६/२०४६५१६. दि. २८/०७/२०२६
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने, "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" हा उपक्रम सुरु करण्याबाबत संदर्भिय शासन निर्णयानुसार कळविण्यात आले आहे. याबाबत सर्व कार्यवाही करण्याची जबाबदारी संदर्भिय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक २(३) नुसार तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेवर तसेच संदर्भिय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक २ (५) नुसार जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेवर सोपविण्यात आली आहे.
सदर उपक्रमासाठी विद्यार्थी निवड ही तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांमधून करण्यात येणार आहे. विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात ही तालुकास्तरापासून होते. तालुकास्तरावरील विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात.
संदर्भ क्र.१ नुसार, "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" हा उपक्रम राबविण्याकरिता जिल्हास्तर व तालुकास्तर समितीचे प्रारूप मान्यतेस्तव सादर करण्यात आले होते. संदर्भिय शासन निर्णय तसेच मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे संदर्भिय पत्रानुसार तालुका स्तरावरील समितीची रचना खालीलप्रमाणे असेल.

  तालुका स्तरावरील समितीः

अ.क्र समिती सदस्य तालुकास्तरीय समितीतील पदनाम
१ गटविकास अधिकारी - अध्यक्ष
२ शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद/ शिक्षण निरीक्षक - सदस्य
३ वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - सदस्य
४ गट शिक्षणाधिकारी
सदस्य तथा तालुका स्तरीय नियंत्रक अधिकारी
५ शिक्षणविस्तार अधिकारी - सदस्य सचिव

(टीपः मुंबई उत्तर/पश्चिम/दक्षिण या जिल्ह्यांमधील तालुकास्तरीय समितीसाठी गट शिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या समक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.)

तालुकास्तरीय समितीची कार्येः

१) तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनातून प्राथमिक व माध्यमिक स्तरातील सर्वसाधारण, दिव्यांग व आदिवासी गटातून प्रत्येकी प्रथम क्रमांकावरील एक याप्रमाणे ०६ विद्यार्थ्यांची निवड करणे,
२) जिल्हास्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान केंद्राच्या भेटीचे नियोजन करणे. (रामन सायन्स सेंटर, नागपूर, पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर, पुणे किंवा नेहरु तारांगण, मुंबई यापैकी जे विज्ञान केंद्र नजीक असेल त्या ठिकाणी)
३) विज्ञान केंद्राच्या भेटीकरिता पर्यवेक्षकांची निवड करणे.
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांनी समितीच्या सभेचे आवश्यकतेनुसार वेळोवेळी आयोजन करणे.
५) भेटीच्या अनुषंगाने जबाबदारी निश्चित करणे.
६) खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन समितीस (DPDC) तरतूद मंजुरीस्तव सादर करणे. (शा.नि. नुसार प्रती व्यक्ती रू. २०,०००/- च्या मर्यादेत)
७) जिल्हा नियोजन समितीकडून (DPDC) मंजुरी प्राप्त झाल्यावार आर्थिक नियमावलीनुसार तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी, निविदा, कार्यादेश इत्यादी प्रक्रिया राबवून घेवून खर्चाचे नियोजन करणे.
८) भेटीच्या सर्व खर्चाचा हिशोब मा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करणे तसेच हिशोबाची एक प्रत संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सादर करणे.
९) भेटीचा अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद तसेच संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सादर करणे.

जिल्हा स्तरावरील समितीः

अ.क्र समिती सदस्य जिल्हास्तरीय समितीतील पदनाम
१ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद - अध्यक्ष
२ प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - सदस्य
३ मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद - सदस्य
४ शिक्षणाधिकारी (प्राथमिक) -सदस्य
५ शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद/शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/ दक्षिण/पश्चिम)
सदस्य सचिव तथा जिल्हा स्तरीय नियंत्रक अधिकारी

जिल्हास्तरीय समितीची कार्येः

१) जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनातून प्राथमिक व माध्यमिक स्तरातील सर्वसाधारण, दिव्यांग व आदिवासी गटातून संबंधित जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून शासनाने जाहीर केले असल्यास प्रत्येकी प्रथम क्रमांकावरील एक याप्रमाणे ०६ विद्यार्थ्यांची निवड करणे.
२) जिल्हास्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बंगळूर येथील इस्रो (ISRO) केंद्राच्या भेटीचे नियोजन करणे,
३) इसो (ISRO) केंद्राच्या भेटीकरिता पर्यवेक्षकांची निवड करणे.
४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद / शिक्षण निरीक्षक, मुंबई (उ/द/प) यांनी समितीच्या सभेचे आवश्यकतेनुसार वेळोवेळी आयोजन व नियोजन करणे.
५) इस्रो (ISRO) केंद्राच्या भेटीच्या अनुषंगाने जबाबदारी निश्चित करणे.
६) खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन समितीस (DPDC) तरतूद मंजुरीस्तव सादर करणे.
(शा.नि. नुसार प्रती व्यक्ती रू. ३५०००/- च्या मर्यादेत)
७) जिल्हा नियोजन समितीकडून (DPDC) मंजुरी प्राप्त झाल्यावार आर्थिक नियमावलीनुसार तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी, निविदा, कार्यादेश इत्यादी प्रक्रिया राबवून घेवून खर्चाचे नियोजन करणे.
८) भेटीच्या सर्व खर्चाचा हिशोब मा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करणे तसेच हिशोबाची एक प्रत संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सादर करणे.
९) भेटीचा अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद तसेच संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सादर करणे.
उपरोक्तप्रमाणे गठीत समितीमार्फत विद्यार्थी निवडीची प्रक्रिया संदर्भीय शासन निर्णयानुसार विहित पद्धतीने व विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्यात यावी. तालुका व जिल्हास्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या कार्यालयास अवगत करण्यात यावे व अनुषंगिक कार्यवाही करण्यात यावी.

सहपत्रः संदर्भिय पत्र

Digitally signed by Rajkumar Pralhadrao Awasare Date: 31-07-2026 11:09:14

(डॉ. राजकुमार अवसरे) 
संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रवी नगर, नागपूर


दूरध्वनी क्र.: ०७१२-२५६२१८१/२५६२९८०
नागपूर- ४४०००१
इ-मेल directorsise@gmail.com

प्रतिलिपी माहितीस्तव सविनय सादरः
१) मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे
३) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
४) मा. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग)
५) मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

प्रति,
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जि.प. (सर्व)
२) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/ दक्षिण/पश्चिम)
३) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)





 Mukhymantri Vidyarthi Vidnyan Wari Upkram

Chief Minister to launch student science fair initiative

"मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" उपक्रम सुरू करणेबाबत.

दिनांक:- ०६ मे, २०२६.

वाचा:-

(१) संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर यांचे पत्र क्र. रा.वि. शि.सं (प्रा.वि.प्रा.)/ मुख्य विज्ञान वारी, दि. १८.०७.२०२५.

(२) संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर यांचे पत्र, क्र. रा.वि. शि.सं (प्रा.वि.प्रा.) / प्रशा-३/ ७३/२०२६, दि. १०.०२.२०२६.


प्रस्तावना:-

विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि गणित विषयातील सर्जनशीलता, कल्पकता व नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात.

(अ) "राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन" हा या उपक्रमाचा एक भाग आहे. राज्यपातळीवर गुणानुक्रमे निवडलेल्या निवडक प्रदर्शनीय वस्तूंची निवड पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी करण्यात येत असते.

(ब) विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात ही तालुकास्तरापासून होते. तालुकास्तरावरील विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात.

(क) दरवर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर ही संस्था समन्वयक यंत्रणा / संस्था म्हणून काम करीत असते.

(ड) प्रत्येक वर्षी राज्यातील तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शने आयोजित करण्यात येत असतात. या स्पर्धांमध्ये अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येत असते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी सहभाग वाढावा व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, तसेच विज्ञान प्रदर्शने महाराष्ट्रात अधिक व्यापक व प्रेरणादायी होण्यासाठी विशेष उपक्रम सुरु करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

२. राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये संशोधनाच्या गुणवत्तेमध्ये परिवर्तन तसेच, विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी एक सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. यास अनुसरून राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी) मधील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. सदर विज्ञान प्रदर्शनांमध्ये विद्यार्थी सहभाग वाढावा व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, याकरिता तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या प्रत्येकी ६ अशा एकूण २१४८ विद्यार्थ्यांना विभागीय सायन्स सेंटरला (नागपूर, मुंबई, पुणे) भेट, जिल्हास्तरांवर निवड झालेल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बंगळूरू येथील इस्रो (ISRO) केंद्राला भेट आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना अमेरिका येथील नासा (NASA) केंद्राला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

      शासन निर्णयः-

राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये विज्ञान शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अनुभवाधारित व प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान अधिक समजण्यास सोपे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल लॅबस्, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणकीय विचार यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्याचा उद्देश आहे. याकरिता "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" हा उपक्रम सुरू करण्यास व या उपक्रमांतर्गत खालीलप्रमाणे भेटीचे आयोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(१) राज्यातील तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या प्रत्येकी ६ असे एकूण २१४८ विद्यार्थी (३५८ X ६ = २१४८) व त्यांच्या सोबतच्या २० पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक यांना रमन सायन्स सेंटर, नागपूर/ पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर, पुणे किंवा नेहरु तारांगण, मुंबई यापैकी जे विज्ञान केंद्र नजीक असेल, त्या ठिकाणी भेट देण्याचे आयोजन करण्यात यावे.

(२) राज्यातील जिल्हा स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक (सर्वसाधारण गट), प्राथमिक व माध्यमिक (दिव्यांग गट) आणि प्राथमिक व माध्यमिक (आदिवासी गट) मधून निवड झालेल्या एकूण १८० विद्यार्थी व ०८ पर्यवेक्षक / शिक्षक यांना बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) केंद्राला भेट देण्याचे आयोजन करण्यात यावे.

(३) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या उत्कृष्ट ५१ विद्यार्थी, ०१-शिक्षक, ०१-शिक्षिका व ०२ प्रशासकीय अधिकारी / समन्वयक अशा एकूण ५५ व्यक्तींना अमेरिका येथील नासा (NASA) केंद्राला भेटीचे आयोजन करण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

(४) राज्यातील तालुकास्तर व जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) तरतूद करून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" चे स्वरूपः-

(१) एन. सी. ई. आर. टी., नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याचप्रमाणे राज्यशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरील बाल वैज्ञानिक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात यावे.

(२) तालुकास्तरावर बाल वैज्ञानिकांना त्या-त्या विभागातील नजिकच्या सायन्स सेंटरला भेट देण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद/ शिक्षण निरिक्षक यांच्या स्तरावर समिती गठित करण्यात यावी. विज्ञान प्रदर्शनाच्या मूल्यमापनासाठी (i) उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) (ii) माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी) असे दोन गट निश्चित करावे. यामधून तालुकास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक स्तरातील सर्वसाधारण, दिव्यांग व आदिवासी गटातून प्रत्येकी प्रथम क्रमांकावरील एक याप्रमाणे ०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी. त्यामुळे तालुकास्तरावरील पात्र विद्यार्थ्यांची संख्या २१४८ (३५८००६) इतकी असून २० पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक अशा एकूण २१६८ व्यक्तीना प्रतिव्यक्ती कमाल रु.२०,०००/- इतका खर्च त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) तरतूद करावी.

(३) मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीतील तालुका स्तरावर विद्यार्थ्यांची निवड करणे, भेटीचे स्थळ निश्चित करणे, भेटीचे नियोजन करणे याची जबाबदारी तालुकास्तरावरील नियंत्रक म्हणून गट शिक्षणाधिकारी यांची राहील. गट शिक्षणाधिकारी यांनी भेटीच्या सर्व खर्चाचा हिशोब गठित करण्यात आलेल्या समितीमार्फत संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सादर करावा.

(४) राज्यातील एकूण ३४ जिल्हे व मुंबई (उत्तर/ पश्चिम / दक्षिण) मधील ०३ याप्रमाणे एकूण ३७ ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन राबविण्यात येते. यापैकी १६ आदिवासी जिल्हे आहेत. जिल्हास्तरीय प्रदर्शनात तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवड झालेले विद्यार्थी सहभागी होतात. जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांच्या दोन गटातून राज्यस्तर प्रदर्शानासाठी निवड करण्यात येते. जिल्हास्तरावरील बाल वैज्ञानिकांची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात यावी. सदर गटातून मुख्यमंत्री विद्यार्थी वारीतील विद्यार्थ्यांना बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी खालीलप्रमाणे निवड करावी :-

अ.क्र. गट राज्यस्तर प्रदर्शनासाठी जिल्हास्तरावर निवड करावयाच्या विद्यार्थ्यांची संख्या.

प्राथमिक विद्याधी गट (सर्वसाधारण) १५ ३७ = ३७

प्राथमिक विद्याधी गट (दिव्यांग) १५ ३७ = ३७

प्राथमिक विद्याथी गट (आदिवासी) १४.१६ = १६

माध्यमिक विद्याची गट (सर्वसाधारण) १४ ३७ = ३७

माध्यमिक विद्याथी गट (दिव्यांग) १४ ३७ ३७

माध्यमिक विद्याधी गट (आदिवासी) १x१६ - १६

एकूण १८०

उपरोक्तनुसार, राज्यातील जिल्हा स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक (सर्वसाधारण गट), प्राथमिक व माध्यमिक (दिव्यांग गट) आणि प्राथमिक व माध्यमिक (आदिवासी गट) मधून निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांसोबतच्या ०८ पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक यांना बंगळूरू येथील इस्त्रो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी प्रतिव्यक्ती कमाल रु. ३५,०००/- इतका खर्च त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) तरतूद करावी.

(५) जिल्हास्तरावरील विद्यार्थ्यांची निवड करणे व भेटीचे नियोजन करणे याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांची राहील. त्यानुसार, गठित करण्यात आलेल्या समितीमार्फत भेटीच्या सर्व खर्चाचा हिशोब संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सादर करावा.

(६) उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी) गटाकरिता राज्यस्तरीय उत्कृष्ट ५१ बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची व ०४ प्रशासकीय अधिकारी/ विज्ञान शिक्षक यांची अमेरिका येथील नासा (NASA) भेटीच्या वारीकरिता निवड संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात यावी. सदर समितीने अमेरिका येथील नासा (NASA) भेटीचे नियोजन करावे.

(७) मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीतील नासा (NASA) येथील केंद्रास भेटीसाठी ५१ विद्यार्थ्यांची निवड खालीलप्रमाणे करण्यात यावी :-

अ. क्र. गट राष्ट्रीयस्तर प्रदर्शनासाठी राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्याथ्यांची संख्या. राष्ट्रीयस्तर प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त गुणानुक्रमे निवड करावयाची विद्यार्थी संख्या मुख्यमंत्री विज्ञान बारीकरिता निवड करावयाची एकूण विद्याची संख्या

१ प्राथमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) ७ १० १७ २

प्राथमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) २ २ ४

प्राथमिक विद्याची गट (आदिवासी) २ २ ४

माध्यमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) ७ ११ १८

५. माध्यमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) २ २ ४

माध्यमिक विद्याची गट (आदिवासी) २ २ ४

एकूण २२ २९ ५१


३. राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या ५१ विद्यार्थी व सोबत जाणाऱ्या ४ प्रशासकीय अधिकारी/ विज्ञान शिक्षकांकरिता ८ दिवसांच्या कालावधीतील अमेरिका येथील नासा (NASA) भेटीच्या वारीकरिता विमान प्रवास खर्च, व्हिसा खर्च, निवास व्यवस्था तेथील प्रवास खर्च यामध्ये वेळोवेळी होणारी वाढ विचारात घेऊन प्रतिव्यक्तीसाठी कमाल रु. ६,००,०००/- याप्रमाणे ५५ व्यक्तींच्या रु. ३,३०,००,०००/- इतक्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी मागणी क्र. ई-२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ०१.

प्राथमिक शिक्षण, १०७ शिक्षक प्रशिक्षण, (०२) अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, (०२) (०६), राज्य विज्ञान संस्थांना त्या चालवित असलेल्या अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्य (कार्यक्रम), (२२०२ एच ८६६), ३१-सहायक अनुदाने, (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली आर्थिक वर्षात नमूद लेखाशीषांतील उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक २४ मार्च, २०२६ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजूरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

4. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०५०६१५३३२००६२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


TUSHAR VASANT

MAHAJAN

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/ प्र. क्र. १४६ (ई-११८०५१६) / एसडी-१, मुंबई- ४०० ०३२ 

   शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon