Swatantrya Din karykram
Organizing Programs For School Students On Occasion of Independence Day and implementing various activities in schools on Republic Day
Regarding conducting a drill march program for school students on the occasion of Independence Day on August 15, 2026 and implementing various activities in schools on Republic Day.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
मध्यवर्ती इमारत. डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१
दूरध्वनी क्र.: ०२०-२६१२०१४
ईमेल-educommoffice@gmail.com
क्र. आशिका/२०२६/कवायत / (आस्था-क १४४)/
दि. स्वाक्षरीखाली नमूद आहे
संदर्भ:-१. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/स्वदि-प्रदि/२०२५/१३३९७५०, दि.२३/०७/२०२५
२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/प्रदि-क.सं./२०२५/, दि.११/१२/२०२५
३. शासन पत्र क्र. क्रमांक:- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी.४, दिनांक:- २४ जुलै, २०२६
महोदय,
राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत शासन परिपत्रक दि. ३१ डिसेंबर, २०२४ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मागील शैक्षणिक वर्षामध्ये दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तसेच दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
संदर्भाधीन शासन पत्र दि.२४ जुलै, २०२६ अन्वये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि.१५ ऑगस्ट, २०२६ रोजी सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत.
शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर साधारणतः २० मिनिटांचा सामुहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यात यावा. यासाठी आवश्यक मार्गदर्शक व्हिडीओची लिंक सोबत उपलब्ध करुन देण्यात आली असून ती सर्व शाळांना पोहचविण्यात यावी. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने करण्यात यावा.
शाळास्तरावर कवायत संचलन कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ बाबतची माहिती भरण्यासाठी सुविधा शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील स्कुल पोर्टलमध्ये मुख्याध्यापकांच्या लॉगिन वर उपलब्ध करून दिली जाईल.
कवायत संचलन कार्यक्रमाचा व्यावसायिक माहितीपट (Professional Documentary) तसेच त्याचा डिजिटल अहवाल संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शासनास व या कार्यालयास सादर करावा. यासाठी आवश्यक ते सहकार्य शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी करावे.
तरी, याबाबत आपल्या स्तरावरुन आवश्यक अतिरिक्त सूचना शाळांना देऊन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, ही विनंती.
(सोबत : मार्गदर्शक व्हिडीओची लिंक)
https://youtu.be/j८F५TbU8OwE?si=YVZFfvIyVjv8yDZ_
आपला,
(हारुन आतार)
शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)
प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव-
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा, (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका (उ/द/प)
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप (सर्व)
प्रत माहितीस्तव सविनय सादरः मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
E-mail id: sd4.sesd-mh@gov.in
दूरध्वनी क्र. २२०२४७४५
क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी.४
दिनांक:- २४ जुलै, २०२६
प्रति,
आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे.
विषय :- दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत.
संदर्भ :-
१. शासनाचे समक्रमांकाचे परिपत्रक, दिनांक ३१ डिसेंबर, २०२४
२. शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दिनांक १९ जुलै, २०२५
३. शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२५
महोदय,
राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत संदर्भाधीन क्र. १ येथील परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
२. राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तसेच, दिनांक २६ जानेवारी, २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात अनुक्रमे संदर्भ क्र. २ येथील व संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये कळविण्यात आले होते व याकरिता कवायतीच्या मार्गदर्शक व्हिडिओची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.
३. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.
४. राज्याचा शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाचा शासकीय झेंडा वंदन कार्यक्रम झाल्यानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. कवायत संचलन कार्यक्रम साधारणतः २० मिनिटे इतका कालावधीचा असावा.
५. दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने करावयाच्या कवायत संचलनाच्या वर नमूद केल्याप्रमाणे व अतिरिक्त सूचना आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना देण्यात याव्यात. तसेच, आयोजित करण्यात येणाऱ्या कवायत संचलन कार्यक्रमाबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा, ही विनंती.
आपला,
TUSHAR VASANT MAHAJAN
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
सहपत्र- वरीलप्रमाणे
प्रत :-
१. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे.
३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे.
४. निवडनस्ती (एस.डी.४)
प्रति,
१. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon