DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Student Promotion in Udise Plus Portal

Student Promotion in Udise Plus Portal 


UDISE Plus GP EP FP Update Available 

GP - General Profile EP- Enrolment Profile FP- Facility Profile

मार्गदर्शक व्हिडिओ पहा


SDMS For Academic Year 2024-25

Udise Plus Portal SDMS Student Promotion For Academic Year 2024-25

Udise Plus Portal (SDMS) 2024-25 students Promotion For Academic Year 2024-25 साठी सुरु झाले आहे.  

शैक्षणिक वर्ष 2023-24 मधून 2024-25 मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे Student Promotion कसे करावयाचे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

How to Do It

Student Promotion A Step By Step Guideline here

Udise plus portal (SDMS) वर Student Promotion 

सगळ्यात अगोदर आपल्याला यु-डायस प्लस पोर्टलवर जावे लागेल त्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे तत्पूर्वी आपण खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात 

लिंक उघडल्यानंतर आपल्याला आपली राज्याची निवड करायची 

🔽

त्यानंतर Login page येईल. तिथे UDISE ची माहिती भरण्यासाठी वापरलेला User ID PASSWORD टाकावा 

Login झाल्यावर Academic year 2023 – 24 व Academic year 2024-25असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी आपण Academic year 2024 -25 ला क्लिक करावे.

त्यानंतर डाव्या कोपऱ्यात जे पर्याय दिसतात त्यामध्ये मध्यभागी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे.

प्रमोशन करण्यासाठी आपल्याला Progression Module वर Go जिथे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची मागील वर्षाची इयत्ता व तुकडी निवडण्याचा पर्याय येईल.

तो निवडून Go वर क्लिक केल्यावर आपल्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी ओपन होईल.

त्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. माहिती भरत असताना त्यामध्ये Progression status मध्ये Promoted हा पर्याय निवडायचा आहे.

Marks मध्ये आपल्याला त्याचे मागील वर्षाचे गुण टक्केवारी मध्ये टाकायचे आहेत हे गुण पूर्णांकातच टाकायचे आहेत. त्यानंतर त्याचे मागील वर्षाचे उपस्थित दिवस व Schooling status मध्ये तो आपल्या शाळेत शिकत आहे की शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला आहे हा पर्याय निवडायचा आहे.

Class and section to be promoted मध्ये आपल्याला त्याची तुकडी निवडायची आहे व हे सर्व झाल्यावर अपडेट वर क्लिक करायचे आहे.

Student Promotion and Finalize

अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व विद्यार्थी promote करायचे आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी promote झाल्यानंतर शेवटी असलेल्या Finalize या टॅबवर क्लिक करून तिथे आपल्याला promote झालेली संख्या दिसेल ते बरोबर असल्यावर confirm यावर क्लिक करायचे आहे.

अशा पद्धतीने आपला एक वर्ग promote झालेला असेल. याच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर वर्ग सुद्धा promote करायचे आहेत.

वरील पद्धतीने आपण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे udise portal वर Student Promotion अगदी मोबाईलवर सुद्धा सहज करू शकतो.

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे.👇

लिंक 

U dise Plus वर स्टुडन्ट प्रमोशन करण्यासाठी खालील स्टेप्स चा उपयोग करा..

Student Module

Select state

Go

Maharashtra

Login 

Enter Username 

And Password 

Select 

2024-25

Progression Activity

Progression Module

Go

Select Class

Select Section

Go

Progression Status

Fill Marks

Fill No of days

Schooling status

Class & Section

Update

Finalize

अशाप्रकारे आपणास आपला वर्ग Promote करता येईल.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon