Std11th Std 12th Admission Fess Tution Fees Term Fees Exam Fees Laboratory Fees Standard Rate
इयत्ता ११ वी इयत्ता १२ वी प्रवेश शुल्क शिक्षण शुल्क सत्र शुल्क परीक्षा शुल्क प्रयोगशाळा शुल्क मानक दर
महाराष्ट्र शासन
क्रमांक : DBT - २०१७/प्र.क्र.२२/एसडी-५ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१८.
प्रति,
१) प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
२) सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
३) सचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
४) सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
विषय : उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन (इ. ११ वी व इ. १२ वी) साठी असलेले प्रमाणित दर.
संदर्भ :
१) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. एफईडी १०८४/ (२५६८)/साशि-५ दि.६/२/१९८७
२) शासन पत्र क्र. डीबीटी-२०१७/प्र.क्र.२२/एसडी-५ दि.२३/१०/२०१८
३) महाडीबीटी विषयक झालेल्या दि. २४/१०/२०१८ च्या बैठकीच्या अनुषंगाने.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भाधिन अ. क्र. २ चे पत्र रद्द समजण्यात यावे.
कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक दराबाबतची सुधारित माहिती संदर्भ क्र. १ चे शासन
निर्णयाच्या अधीन राहून खालीलप्रमाणे सादर केली आहे. तरी कनिष्ठ महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्काची विभागनिहाय माहिती DBT पोर्टलवर By default घेण्यात यावी.
माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती १९८६ मधील विभाग सात, ५२.१ अन्वये शालेय वर्ष दोन सत्रात विभागले जाईल. पहिले सत्र जून ते ऑक्टोबर आणि दुसरे सत्र नोव्हेंबरपासून एप्रिल पर्यंत राहील असे समजण्यात यावे, तसेच राज्य मंडळ, पुणे यांचे पत्र क्रमांक रा.मं./ लेखा ६/७३४३ दिनांक ३० सप्टेंबर २०१६ चे अन्वये परीक्षा शुल्काची रक्कम दर्शविण्यात आलेली आहे.
टीप : त्या त्या इयत्ताकरिता दरमहा
आकारण्यात येणाऱ्या शिक्षण फीच्या दराने प्रवेश फी व सत्र फी आकारण्यात येते.
प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय व द्वितीय वर्ष कनिष्ठ महाविद्यालय हया दोन्ही
इयत्ता एकाच संस्थेशी संलग्न असतील तर त्या संस्थेत हया इयत्तापैकी कोणत्याही एका
इयत्तेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी फक्त एकदाच प्रवेश फी आकरण्यात यावी.
(शासन निर्णय, शिक्षण
व युवक सेवा विभाग क्र. एचएससी/१०७६/४१९-बीस-एकवीस, दिनांक ६-५-१९७६)
आपला (मिलिंद सराफ)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon