DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std 5th 8th Join to ZP MNP NP School Varga Jodane GR

Std 5th 8th Join to ZP MNP NP School Varga Jodane GR


Std 5th 8th Join to ZP MNP NP School Varga Jodane GR

विषय: समूह साधन केंद्र शाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळा याप्रकारच्या शाळांना इयत्ता ५ वी इ.८ वी/ उच्च प्राथमिक/माध्यमिकचे वर्ग जोडणेबाबतच्या पट संख्येच्या अटीच्या संदर्भात स्पष्टीकरण...


संदर्भ :

१. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय प्राशाव-२०२३/प्र.क्र.९७/एस.एम-५/दि.१५/३/२०१४

२. संचालनालयाचे पत्र क्र प्राशिसे/टे-३०१/२०२५/३२६७/दि.२६/६/२०२५

३. राज्यस्तरीय शिक्षण परिषद मधील चर्चा


महोदय,

उपरोक्त विषयाबाबत शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि. १५/३/२०२४ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमा इयत्ता ५ वी / इ.८ वी / उच्च प्राथमिक/माध्यमिकचे वर्ग जोडणेबाबतची कार्यपध्दती विशद करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र.५ मध्ये पुढीलप्रमाणे नमूद केले आहे


केंद्रशाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळा तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३० व उच्च प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३५ व त्यापेक्षा जास्त विदद्यार्थी असल्यास यांना प्राधान्याने इ.१ ली ते ४ थी च्या शाळांना इयत्ता ५ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता १ ली ते इ.७ वी च्या शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग व आवश्यक असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यात यावेत.


याबाबत पटसंख्येच्या अटी संदर्भात पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे


समूह साधन केंद्र शाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळांमध्ये इयत्ता ५ वी/ इ.८ वी / उच्च प्राथमिक/माध्यमिकचे वर्गजोडणी करिता पटसंख्येची अट लागू नाही. याव्यतिरिक्त इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये वर्ग जोडण्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३० व उच्च प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३५ व त्यापेक्षा जास्त पटसंख्येची अट संदर्भीय शासन निर्णय, दिनांक १५.०३.२०२४ प्रमाणे असणार आहे.


तरी वरील सर्व बाबींचा विचार करून आपल्या कार्यक्षेत्रात येणा-या समूह साधन केंद्र शाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांबाबत इ.१ ली ते ४ थी च्या शाळांना इयत्ता ५ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता १ ली ते इ.७ वी च्या शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग व आवश्यक असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

Circular pdf Copy

Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 2009 12:26:45 


शिक्षण संचालक (प्राथमिक) 

प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे


प्रत: महितीस्तव सविनय सादर-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


ALSO RAED - 


Schools of Zilla Parishad Management / Municipal / Municipal Corporation / Cuttack Mandal in the state Regarding addition of classes of 5th and 8th.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

दालन क्र.४३६, विस्तार इमारत, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई - ४०००३२.

परिपत्रक दिनांक : २६.०६.२०२३

 


राज्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळाच्या शाळांना इ. ५ वी व इ. ८ वी चे वर्ग जोडण्याबाबत.

Std 5th 8th Join to ZP MNP NP School Varga Jodane GR

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे- ०१

परिपत्रक

दिनांक : ०८.०६.२०२३

विषय:- राज्यातील न.पा./म.न.पा./कटक मंडळाच्या शाळांना ५ व ८ वी चे वर्ग जोडणेबाबत


महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे- ०१

परिपत्रक दिनांक : ०४.०५.२०२३

विषय:- राज्यातील न.पा./म.न.पा./कटक मंडळाच्या शाळांना ५ व ८ वी चे वर्ग जोडणेबाबत


सर्व परिपत्रके एकाच ठिकाणी वाचा किंवा डाऊनलोड करा  

शासन निर्णय Circular Govt GR pdf Download करण्यासाठी CLICK HERE वर टिचकी मारा 
CLICK HERE 👇

आपल्या समाज माध्यमा मध्ये सामील व्हा आणि अद्यावत रहा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon