DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

"महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६" अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याबाबत क्षेत्राधिकार व कार्यपद्धतीविषयी निर्देश Women Farmer Certificates

 Mahila Shetkari Pramanpatra



Women Farmer Certificates


maharashtra mahila shetkari sakshamikaran adhinium, 2026" antargat mahila shetkari pramanpatra denyababat kshetradhikar v karyapaddhativishayi nirdesh


Instructions regarding jurisdiction and procedure for issuing 

women farmer certificates under the "Maharashtra Women Farmers Empowerment Act, 2026"


महाराष्ट्र शासन

कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई

क्रमांकः संकिर्ण-२०२६/प्र.क्र.१७७/३ ओ

दिनांक:-०१.१०.२०२६


तत्काळ/अतिमहत्त्वपूर्ण


प्रति,

१. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (सर्व)

२. उपविभागीय अधिकारी कृषि (सर्व)

३. तालुका कृषि अधिकारी (सर्व)

४. कृषि अधिकारी (सर्व)


     विषयः- "महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६" अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याबाबत क्षेत्राधिकार व कार्यपद्धतीविषयी निर्देश.


संदर्भ:-महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६, दि.२२ जुलै, २०२६.


राज्यातील महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी "महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६" दि. २२ जुलै, २०२६ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत दि. १७ सप्टेंबर, २०२६ पासून "महिला शेतकरी प्रमाणपत्र" पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत राज्यभरातून या उपक्रमास उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून, दि. १ ऑक्टोबर, २०२६ अखेर सुमारे १९ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज प्राप्त होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे.

२. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ मधील कलम ३ नुसार, अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची, ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात राहणारी आणि शेती व शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत असलेली महिला ही सदर अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळण्यास पात्र असून, तिला महिला शेतकरी प्रमाणपत्र देता येईल. त्यानुसार, महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केवळ ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रातील पात्र महिलांपुरतीच करण्यात यावी.

३. नगरपालिका/नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद नियमांमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे, अशा महिलांना सदर अधिनियमांतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र निर्गमित करू नये.

तरी, सर्व संबंधित अधिकारी यांनी वरील सर्व तरतुदींची नोंद घ्यावी आणि त्यानुसारच महिला शेतकरी प्रमाणपत्राबाबतची पुढील कार्यवाही काटेकोरपणे पार पाडावी.


आपला,


कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon