Shala Pravesh Kiman Vay Nischit GR
दिनांक : १५ ऑक्टोबर, २०२६.
वाचा:-
१. शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र, क्र. प्राशिसं/ड-३०१/२०२४/७५८८, दि. ०४.१२.२०२४.
२. सह सचिव, स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र, क्र. D.O. No. २२-७/२०२१-EE. १९/ IS.१३, दि. १५.०२.२०२४.
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. आरटीई २०१८/प्र. क्र. १८०/एसडी-१, दि.१८.०९.२०२०.
४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. आरटीई ९८१४/प्र. क्र. ११९/ एसडी-१, दि.२५.०७.२०१९.
५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीण ९८१४/प्र. क्र. १६०/एसडी-१, दि.२५.०१.२०१७.
६. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीण ९८१४/ प्र. क्र. १६०/ एसडी-१, दि.२३.०१.२०१५.
७. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीण ९८१४/प्र. क्र. १६०/ एसडी-१, दि. २१.०१.२०१५.
८. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. पीआरई-२०१०/ (२१५)/ प्राशि-१, दि.११.०६.२०१०.
प्रस्तावना :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार बालकांच्या शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती शासन निर्णय, दि. ११.०६.२०१० अन्वये निश्चित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतुदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते. राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी. बी. एस. ई., आय. सी. एस. ई., आय. बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये बालकांच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्यात आले आहे.
२. उपरोक्त तरतुदींमुळे शैक्षणिक वर्ष सुरू होताना प्ले ग्रुप/ नर्सरी (इ. १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) २.५ वर्ष आणि इ. १ ली साठी प्रवेश देताना ५.५ वर्ष वयाच्या मुलांना प्रवेश दिला जातो. आता, केंद्र शासनाने इ. १ ली साठी प्रवेश देताना ६+ वर्ष वयाच्या मुलांना प्रवेश द्यावा, असे कळविलेले आहे. तसेच, नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार, बालकांचे इयत्ता पहिलीतील वयाचे ६+ धोरण राबविताना पूर्व प्राथमिक (१ ली पूर्व) वर्गांना वयाचे धोरण ठरविल्यास इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना वयाच्या अटीचा पुढील ३ वर्ष अडथळा येणार नाही, याकरिता बालवाडी/अंगणवाडी / नर्सरी यात प्रवेश देताना मुलाचे वय ३० जून रोजी ३ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेशाबाबतची टप्याटप्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
सदर शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालील तक्त्यात नमूद करण्यात आल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
|
अ.क्र. |
प्रवेशाचा वर्ग |
किमान वय वर्ष |
वयाबाबत मानीव दिनांक |
अंमलबजावणी वर्ष |
|
१ |
बालवाटीका-१/ नर्सरी (इ. १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) +३ |
+३ |
३०
जून |
२०२७-२८
पासून |
|
२ |
२ बालवाटीका-२/ ज्युनिअर के. जी. (इ. १ ली पूर्वीचा २ रा वर्ग) |
+४ |
३०
जून |
२०२८-२९
पासून |
|
३ |
बालवाटीका-३/सिनिअर के. जी. (इ. १ ली पूर्वीचा १ ला वर्ग |
+५ |
३०
जून |
२०२९-३०
पासून |
|
४ |
इयत्ता १ ली |
+६ |
३०
जून |
२०३०-३१
पासून |
२. पायाभूत वर्गासाठी नामांकन, नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय निकषांसह, राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.
३. उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वयाचे निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जातील.
४. सन २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रासाठी नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्याथ्यांसाठी हे वयाचे निकष लागू होणार नाहीत.
५. पूर्व-प्राथमिक वर्गाच्या (नर्सरी) ते इयत्ता पहिलीसाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वय १५ दिवसांची वयाची सूट दिली जाईल.
६. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील उच्च वर्गात प्रवेशासाठी वयानुसार निकष लागू करण्यापासून सूट दिली जाईल.
७. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून प्रवेश घेण्यासाठी, बालकांचे दि. ३० जून रोजी उपरोक्त तक्त्यात दर्शविल्यानुसार किमान वय पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. (म्हणजेच, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये ३+ वर्षाच्या वयात नर्सरीमध्ये प्रवेश करणारे बालक ६+ वर्षाच्या वयात इयत्ता पहिलीमध्ये असेल.)
८. पूर्व-प्राथमिक वर्ग आणि इयत्ता पहिलीसाठी नवीन वयाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सूचना/मार्गदर्शक सुचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या स्तरावरून देण्यात याव्यात.
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६१०१५१७१४४७१०४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
GR PDF COPY LINK
Minimum Age Of a Child For School Admission Fixed
Shala Praveshasathi Balakache Kiman Vay Nishchit
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी-१
मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १८ सप्टेंबर, २०२०
संदर्भ:-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. पीआरई-२०१०/(११५)/प्राशि-१, दिनांक ११ जून, २०१०
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.: आरटीई-९८१४/प्र.क्र.१६०/एस.डी-१, दिनांक २१ जानेवारी, २०१५, दिनांक २३ जानेवारी, २०१५, दिनांक २५ जानेवारी, २०१७
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.: आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१, दि.२५ जुलै, २०१९
४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.प्राशिसं/आरटीई-५२०/बालकाचे वय/२०२०/९०९, दि.१८ फेब्रुवारी, २०२०
प्रस्तावना:-
शासनाने दि.११ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतूदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते. राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णय दिनांक २१/०१/२०१५ व दि.२३/०१/२०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये ३१ जुलै हा मानिव दिनांक गृहीत धरुन बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिक (इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) (प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी) साठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता १ ली साठी ६ वर्षे पूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शासन निर्णय दि.२५/०१/२०१७ अन्वये
शाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि.२५/०७/२०१९ अन्वये शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. १८/०२/२०२० रोजीच्या पत्रान्वये बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरुन शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.
शासन निर्णय:-
सदर शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे:-
अ.क्र. प्रवेशाचा वर्ग किमान वय वर्ष वयाबाबत मानिव दिनांक अंमलबजावणी वर्ष
१ प्ले ग्रुप / नर्सरी (इ.१ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) ३+ ३१ डिसेंबर २०२१-२२ पासून
२ इयत्ता १ ली ६+ ३१ डिसेंबर २०२१-२२ पासून
२. सदर आदेश राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२००९१८१६११११९५२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
जा. क्र. आरटीई २५%/२०२५/८09/1343
दि. ०७-०३-२०२५ 10 MAR 2025
विषय: पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशाचे किमान वय निश्चित करणेबाबत.
संदर्भ : १) माहिती अधिकार नागरी समूह यांचा दि. ०३-०२-२०२५ चा अर्ज.
२) शासन निर्णय दि. १८-०९-२०२०.
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय शासन निर्णय दि. १८ सप्टेंबर, २०२० नुसार प्ले ग्रुप, नर्सरी, इ. १ली पूर्वीचा तिसरा वर्ग किमान वय ३+ वया बाबत मानीव दिनांक डिसेंबर व इयत्ता पहिलीसाठी ६+ वयाबाबत मानीय दिनांक ३१ डिसेंबर हा निश्चित करण्याचे निर्देश आहेत परंतु माहिती अधिकार नागरी समूह या संस्थेने दिनांक ०३-०२-२०२५ नुसार उपरोक्त शासन निर्णयाचे पुणे जिल्हयातील शाळा पालन करत नसल्याचे तक्रार दाखल केल्या आहेत.
तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने व शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय याची अंमलबजावणी करणे बाबत शाळांना सक्त ताकीद देण्यात यावी शाळा शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसतील तर शाळांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी,
सोबत माहिती अधिकार नागरिक समूह यांचा तक्रार अर्ज.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१,
प्राथमिक शिक्षण संचालनालय
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे.
२. प्रशासन अधिकारी, पुणे मनपा.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, पुणे.
४. प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा,



Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon