National Deworming Day Campaign
Pradhan manthi Poshan Shakti Nirman PM POSHAN
महाराष्ट्र शासन
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
संदर्भ: सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अशासकीय पत्र क्र. संकिर्ण-१९२६/१८२/प्र.क्र.३०/कु.क.१, दिनांक १९ ऑक्टोबर, २०२६.
उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात दरवर्षीप्रमाणे सन २०२६-२७ या वर्षात १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुले व मुली यांच्याकरिता 'राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.
आतड्यांमधील कृमी दोषामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) आणि कुपोषणाचे प्रमाण वाढते, ज्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर आणि शैक्षणिक प्रगतीवर होतो. १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण स्थिती आणि जीवनाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने अंगणवाडी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खालील वेळापत्रकानुसार मोहीम राबविण्यात येणार आहे.
> राष्ट्रीय जंतनाशक दिन: मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर, २०२६
> मॉप-अप दिन (सुटलेल्या विद्यार्थ्यांसाठी): मंगळवार, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२६
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा, महानगरपालिका व तालुका स्तरावर खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावेः
१. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीः मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागामार्फत जिल्हा व तालुका पातळीवर तात्काळ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व नियमित मूल्यमापन करण्यात यावे.
२. जिल्हा समन्वय समिती बैठकः जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समन्वय समितीच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य विभागाशी योग्य समन्वय साधावा.
३. विद्यार्थी संख्येची माहितीः शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांची अचूक संख्या तात्काळ स्थानिक आरोग्य विभागास उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून पुरेशा प्रमाणात जंतनाशक गोळयांचा (Albendazole Tablet) साठा आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येईल.
४. सर्व शाळांचा समावेशः जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था (जि.प./मनपा/नपा) शाळा, शासकीय अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, केंद्रीय/नवोदय/सैनिक/सीबीएसई शाळा, खाजगी इंग्रजी शाळा, मदरसे, मिशनरी शाळा, गुरुकुल, वसतिगृहे, बालगृहे तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालये व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (उदा. III, तंत्रनिकेतन इ.) प्रथम वर्षातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचा यात १००% सहभाग सुनिश्चित करावा.
५. प्रशिक्षणः प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) व नागरी आरोग्य केंद्रांच्या (UPHC/हेल्थ पोस्ट) वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून घ्यावे..
६. प्रसिद्धी व जनजागृतीः सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त होणारे प्रसिद्धी साहित्य व फलक शाळांच्या दर्शनी भागात व सूचना फलकावर लावून विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करावी.
७. क्षेत्रभेटी व सनियंत्रणः २७ ऑक्टोबर २०२६ व ०३ नोव्हेंबर २०२६ या दिवशी शिक्षण विभागातील विस्तार पर्यवेक्षकीय यंत्रणेने प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन देखरेख (Supervision) करावी. त्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा.
वरील सर्व सूचनांची आपल्या स्तरावरून काटेकोर अंमलबजावणी करून मोहिमेदरम्यान कोणतीही पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनी जंतनाशक गोळीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
Digitally signed by Ramakant Mahadeo Kathmore Date: 22-10-2026 16:21:47
(रमाकांत काठमोरे)
शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 22-10-2026 16:31:11
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक,
शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च, माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
Rashtriya Jantnashak Mohim Din Rajyat Prabhavipane Rabavinyababat Suchana Shasan Nirnay
Instructions regarding the effective implementation of the National Deworming Campaign/Day in the state GR
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन राज्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. शापोआ २०२६/प्र.क्र.१५७/एसडी-३ मंत्रालय, मुंबई
दिनांक :- २२ ऑक्टोबर, २०२६
वाचा:
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे अ.शा.क्र.संकिर्ण १९२६/१८२/प्र.क्र.३०/कु.क.१, दि.१९ ऑक्टोबर, २०२६ रोजीचे अर्धशासकीय पत्र.
शासन परिपत्रक:-
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनी दि.१९ ऑक्टोबर, २०२६ रोजीच्या अर्धशासकीय पत्रान्वये "दि. २७ ऑक्टोबर, २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन राज्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेमध्ये वय वर्षे १ ते १९ वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशकाची एक गोळी खाऊ घालण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश सदर वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.
सन २०१४-१५ या वर्षापासून ही मोहिम राज्यात राबविण्यात येत आहे. दर वर्षीप्रमाणे सन २०२६-२७ मध्ये १ ते १९ वर्ष वयोगटातील राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. अंगणवाडी / शाळा / कनिष्ठ महाविदयालय / वरिष्ठ महाविद्यालय (प्रथम वर्ष) या स्तरावर दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी "राष्ट्रीय जंतनाशक दिन" व या मोहिमेच्या दिवशी अनुपस्थित /सुटलेल्या मुला मुलींकरिता दि. ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप अप दिन राबवावयाचा आहे. तरी जंतनाशक दिन मोहिमेदरम्यान अंगणवाडी / शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्ष यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेचा लाभ देता येईल.
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम / दिन साठी खालील लक्ष निश्चित करण्यात आले आहे.
1. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आतड्यांतील जंताचा प्रादुर्भाव कमी करणे.
ii. बालकांचे व किशोरवयीन मुला-मुलीचे आरोग्य सुधारणे, रक्तक्षय व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत करणे.
ii. वय वर्षे १ ते १९ वयोगटातील मुले व मुलीची पोषण स्थिती सुधारून त्यांच्या शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे, शारीरिक व बौध्दिक वाढ करण्यास मदत करणे.
सदर जंतनाशक मोहिम / दिन दरम्यान अंगणवाडी / शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्ष यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेचा लाभ देता येईल.
दि.२७ ऑक्टोबर, २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम/दिन राज्यात प्रभाविपणे राबविण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
1. शालेय शिक्षण विभागांतर्गत येणा-या एकूण लाभार्थ्यांची संख्या आरोग्य विभागास कळवावी जेणेकरुन त्यांना पुरेशा प्रमाणात जंतनाशक गोळयांचा (Albendazole Tablet) साठा आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येईल.
i. शिक्षण विभागाद्वारे सर्व शासकीय शाळा/शासकीय अनुदानित शाळा/आश्रम शाळा/नगरपालिका/महानगरपालिका शाळा, सर्व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळा, आर्मी स्कूल, सी. बी. एस. ई. स्कूल, नवोदय विदयालय, सुधार गृह सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकूल, संस्कार केंद्र, सर्व कनिष्ठ महाविदयालय व वरिष्ठ महाविदयालयाचे प्रथम वर्षाचे विदयार्थी (नर्सिंग कॉलेज, आय. टी. आय. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविदयालय, डी. एड. महाविद्यालय) यांचा जंतनाशक मोहिमेमध्ये समावेश करुन घ्यावा.
Ⅲ. विभागाच्या अधिपत्याखालील संबंधित अधिका-यांद्वारे राष्ट्रीय जंतनाशक दिन व मॉप अप दिनी संनियत्रण व पर्यवेक्षणाकरिता क्षेत्रभेटी करण्यात याव्यात व त्यांचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करण्यात यावा.
जंतनाशक मोहिमेकरिता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितींची स्थापना करण्यात आली आहे. जंतनाशक मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता सदर समितीची बैठक घेण्याकरिता समन्वय साधावा. सदर मोहिमेकरिता आरोग्य विभागामार्फत शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तसेच शाळेचे नोडल शिक्षक यांचे प्रशिक्षण वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या स्तरावर घेण्यात येणार आहे आणि महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व महानगरपालिका शाळा व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण हे तेथील हेल्थ पोस्टच्या वैदयकीय अधिकारी यांच्या स्तरावर घेण्यात येणार असून सदर प्रशिक्षणास संबंधितांनी उपस्थित राहावे.
जंतनाशक गोळ्या देताना आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. आजारी असलेल्या किंवा औषध देण्याबाबत विशेष काळजी आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा
सल्ला घ्यावा. औषध सेवनानंतर कोणतीही प्रतिकूल लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध असणारे प्रसिध्दी साहित्य शाळा / अंगणवाडी तसेच गावातील प्रमुख ठिकाणी व दर्शनिय भागांमध्ये लावण्यात यावे.
शालेय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांनी परस्पर समन्वयाने मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी.
संदर्भाधिन पत्रान्वये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम/दिन राज्यात प्रभाविपणे राबविण्यासाठी खालील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
अ.क्र. पदनाम स्तर
१.सह संचालक, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
राज्य
२. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य)
जिल्हा
३. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी सर्व महानगरपालिका
महानगरपालिका
वरील सूचनांनुसार संबंधित सर्व विभाग प्रमुख, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, व संबंधित आरोग्य अधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलाल असून त्याचा संकेताक २०२६१०२२११२१३१३७४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
उप सचिव, महाराष्ट्र शासन





Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon