Ek Bharat Shreshtha Bharat programme
Ek Bharat Shreshtha Bharat Upkram
Ek Bharat Shreshtha Bharat circular gr
"ek bharat-shreshth bharat "yojaneantargat sarv shalanmadhye upkram rabavine babat paripatrak
Regarding implementing activities in all schools under the "One India-Best India" scheme
जा.क्र.राशैसंप्रपम/कला व क्रीडा/EBSB/सन२०२६-२७/प्रति, दिनांकः स्वाक्षरी खाली नमूद
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
३. शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य), सर्व
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर मुंबई)
५. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा, सर्व
विषय : "एक भारत-श्रेष्ठ भारत "योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविणे बाबत
संदर्भ : १. मा. संचालक, भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, PACE Section, नवी दिल्ली यांचे पत्र जा. क्र F.No.1-7/2019-IS.5/PACE, Dated: 9th September, 2026 (बैठकीचे इतिवृत्त)
२. भारत सरकार शिक्षा मंत्रालय द्वारे आयोजित ऑनलाईन बैठक दि. २१ ऑगस्ट, २०२६ (मा. सहसंचालक, भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, PACE Section, नवी दिल्ली यांचे पत्र जा. क्र F.No.1-7/2019-IS.5(Part.2)/PACE, Dated: 20th August 2026.)
३. मा. राजेशकुमार मौर्य, उपसचिव भारत सरकार यांचे पत्र दि.२०/११/२०२० ( सुधारित मार्गदर्शक सूचना)
उपरोक्त विषयाबाबत, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत "एक भारत - श्रेष्ठ भारत " योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, भौगोलिक, जैविक विविधता, वेगवेगळे प्राणी, वनस्पती, संगीत, नृत्य, लघुचित्रपट चित्रपट, हस्तकला, खेळ, सण-उत्सव, साहित्य, चित्र-शिल्प या सर्वामध्ये विविधतेचे दर्शन होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून विविधता टिकविणे व त्याबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी देशातील राज्या-राज्यांची जोडी करुन राज्यांमधील उपरोक्त नमूद बाबींची माहिती करून घ्यावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याची ओरिसा या राज्यात सोबत जोडी (Pairing) करण्यात आलेली आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत या उपक्रमातंर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये संदर्भ क्र. ३ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार उपक्रम घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. तथापि संदर्भ क्र. १,२ नुसार ऑनलाईन बैठकीचे इतिवृतानुसार सदर उपक्रम आयोजित करणे बाबत आदेशित करण्यात आले आहे.
संदर्भ क्र. ३ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ते १२ वीच्या शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रम कार्यान्वित कण्यात यावे. यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा समावेश करण्यात यावा. एक भारत- श्रेष्ठ भारत या उपक्रमातंर्गत सोबत जोडलेल्या यादीतील उपक्रम शाळांमध्ये माहे सप्टेंबर, २०२६ व एप्रिल, २०२७ या कालावधीत राबविण्यात यावेत. एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रम शालेय शाळेत राबविण्या संदर्भात
अधिक वाचा या ओळीला स्पर्श करून


Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon