Shikshak Padonnati Paripatrak
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,
मुंबई
क्रमांक :न्यायाप्र-२०२६/प्र.क्र. २९४/टीएनटी-१
दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२६
प्रति,
१) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२) संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
३) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.
४) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
५) सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई.
६) प्रशासन अधिकारी, सर्व महानगरपालिका.
विषय : रिट याचिका क्र. ७७२४/२०२६ व इतर गजानन नारायण चव्हाण व इतर याचिकाकर्ते
संदर्भ : मा. सरकारी वकील (अपील शाखा), उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्र. GP/WP/NSB/१२८३९/२०२६, दि. ३१.०८.२०२६.
महोदय,
प्राथमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीसंदर्भात विविध बाबींच्या अनुषंगाने विषयांकित रिट याचिका क्र. ७७२४/२०२६ व इतर समान स्वरुपाच्या याचिकांच्या दि.३१.०८.२०२६ रोजी झालेल्या एकत्रित सुनावणीवेळी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या मुख्यपिठाने या सर्व याचिकांची पुढील एकत्रित सुनावणी दि. १०.०९.२०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता ठेवली आहे. या सुनावणीवेळी मा. मुख्यपिठाने इतर खंडपीठांसमोर याच विषयाच्या समान याचिका प्रलंबित असल्यास त्या प्रकरणांमध्ये परस्पर विरोधी भूमिका जाऊ नये यासाठी या प्रकरणामध्ये पुढील आदेश होईपर्यंत अशा समान याचिकांमध्ये इतर खंडपीठांकडून आदेश/निर्देश पारित केले जाऊ नयेत याबाबत मा. सरकारी वकील (अपील शाखा), उच्च न्यायालय, मुंबई यांनी इतर सर्व सरकारी वकीलांना अवगत करावे, असे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये मा. सरकारी वकील (अपील शाखा), उच्च न्यायालय, मुंबई यांनी आवश्यक त्या सूचना सर्व सरकारी वकीलांना दिल्या आहेत.
हेही वाचाल - जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्याबाबत.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२६/प्र.क्र. २४४/टीएनटी-१,मंत्रालय, मुंबई शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून
दिनांक : २९ जुलै, २०२६.
२. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी मा. मुख्यपिठाचे निर्देश व त्यानुषंगाने मा. सरकारी वकील (अपील शाखा), उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भाधीन दि. ३१.०८.२०२६ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या सूचना विचारात घेता, आपणांस सूचित करण्यात येते की, आपल्या कार्यालयाशी संबंधित विषयांकित रिट याचिका क्र. ७७२४/२०२६ व इतर याचिकाप्रमाणे प्राथमिक/उच्च प्राथमिक शिक्षकांच्या विविध पदांवरील पदोन्नतीशी संबंधित सर्व समान स्वरुपाच्या याचिका मा. उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यास त्याबाबत उपरोक्त संदर्भाधीन दि. ३१.०८.२०२६ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचना संबंधित सहाय्यक सरकारी वकीलांशी समन्वय साधून मा. उच्च न्यायालयाच्या संबंधित खंडपीठाच्या निदर्शनास आणण्याची दक्षता घ्यावी. अशा कोणत्याही समान स्वरुपाच्या याचिकांमध्ये पुढील कार्यवाही होऊ नये यासाठी यथाशक्ति आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच अशा समान स्वरुपाच्या याचिकांची यादी शासनास सादर करावी.
(मनोज मि. काळे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित
१. मा. सरकारी वकील (अपील शाखा), उच्च न्यायालय, मुंबई
२. निवड नस्ती, टीएनटी-१


Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon