Hindi Language Examination Cancelled GR
भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करणेबाबत
bhasha sanchalanalayamarfat ghenyat yenari hindi bhasha pariksha radd
Hindi language examination conducted by the Directorate of Languages cancelled.
भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करणेबाबत.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्र. विश्वको-२०२५/प्र.क्र.१२८/भाषा-२
नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक :- ३१ ऑगस्ट, २०२६
वाचा :-
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप १९७६-२८, दि. १० जून, १९७६
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप १०८०/१३१-वीस, दि. २५ मे, १९८१
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप १०८१-३०५-वीस, दि. २१ जून, १९८२
४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप-१०८२/१८९६/प्र-४१३/वीस, दि. २२ नोव्हेंबर, १९८२
५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप-१०८३/१४४८/वीस, दि. १ डिसेंबर, १९८४
६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिंभाप-१०८५/६८४/२०, दि. १९ नोव्हेंबर, १९८५
७) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. हिभाप-१०९२/१३०६/(प्र.क्र.१२९/९२)२०, दि. १६ नोव्हेंबर, १९९२
प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारने शासकीय प्रयोजनांसाठी हिंदी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. मात्र, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषेचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतुदी आणि सद्यःस्थितीतील शासकीय कामकाजाचे स्वरूप विचारात घेता, हिंदी भाषा परीक्षा लागू ठेवणे संयुक्तिक नाही. शासनाच्या कामकाजात हिंदी भाषेचा वापर अत्यंत नगण्य असून, केंद्र सरकार व इतर राज्यांशी होणारा पत्रव्यवहार प्रामुख्याने इंग्रजी भाषेत केला जातो. ही वस्तुस्थिती विचारात घेता, भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :- भाषा संचालनालयाद्वारे घेण्यात येणारी (पुर्वीच्या एतदर्थ मंडळाद्वारे घेण्यात येणारी) हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यात येत आहे.
हिंदी भाषा परीक्षेसंदर्भात आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले संदर्भाधीन शासन निर्णय तसेच, तत्संबंधित निर्गमित इतर सर्व शासन निर्णय, परिपत्रके, आदेश, शासनपत्र या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.
सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी हिंदी भाषा परीक्षेस स्थगिती दिल्याच्या दिनांकापासून, दिनांक ०७.०५.२०२६ पासून करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२६०८३११८२२४५२४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon