DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

State Level Childrens Science Exhibition राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण संचालक आदेश

State Level Childrens Science Exhibition

बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण संचालक आदेश


Rajyastariya Bal Vaidnyanik Pradarshan

State Level Children's Science Exhibition

Rajyastariya Bal Vaidnyanik Pradarshanachya Shasan Nirnayanchi Ammalbajavani Karnyababat

Regarding the implementation of government decisions for the State Level Children's Science Exhibition

महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय,पुणे


दिनांकीत स्वाक्षरी

क्र.प्राशिसं/८०३/संकीर्ण/ २०२६


प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)

३. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई

४. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम)

५. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा (सर्व)

      विषयः राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबत.

संदर्भ : १. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र. १४६/ एस.डी.-१, दिनांक २४ मार्च, २०२६

२. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/ प्र. क्र. १४६ (ई-११८०५१६)/ एसडी-१, दिनांक ०६ मे,२०२६

३. राज्य विज्ञान संस्था यांचे पत्र क्र. राविशिसं/प्राविप्रा/नाग/रा.बा.वै.प्र./२०२६ दि.२६.०५.२०२६


            उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या शासन निर्णयांची अमलबजावणी करण्याबाबत राज्य विज्ञान संस्था नागपूर यांचे या कार्यालयास लिहीलेले व आपणास पृष्ठांकीत केलेले पत्र पहावे (प्रत संलग्न) संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद केल्यानुसार उपक्रम तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर राबविण्याचे राज्य विज्ञान संस्था यांच्या कडून सुचित करण्यात आले आहे. राज्यस्तरावर प्रदर्शन राबविण्याकरिता राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर ही संस्था नियंत्रक यंत्रणा आहे. राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये प्राथमिक/ माध्यमिक विद्यार्थी / शिक्षक / प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर यांना प्रदान करण्यात येणा-या बक्षिसांच्या रक्कमेमध्ये उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयाद्वारे वाढ करण्यात आली आहे. (प्रत संलग्न)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विज्ञान शिक्षणाला महत्व दिले असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, तर्कशुद्ध विचार सरणी आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसीत करणे, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल लॅब्स, कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) आणि संगणकिय विचार रुजवून संशोधन वृत्ती आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्ष पासून सुरु करण्याबाबत निर्देश आहेत. संदर्भ क्रमांक २ नुसार "मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" उपक्रम सुरू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

उपरोक्त राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शना संदर्भात आपल्या स्तरावरून क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक निर्देश द्यावेत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेता येईल व वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यात रूजवता येईल.

Digitally signed by

Mahesh Madhukar Palkar

Date: 11-08-2026

22:11:00

(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य-०१

Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 11-08-2026 11:29:25

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य-०१

प्रत माहीतीस्तव सविनय सादरः १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ २. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे-०१

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षीसाच्या रकमेत वाढ करणे.

"मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी" उपक्रम सुरू करणेबाबत.

Rajyastariya Bal Vaigyanik Pradarshan


सर्व संदर्भीय परिपत्रके व शासन निर्णय पिदेफ लिंक 

बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण संचालक आदेश


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon