Bhatke Vimukta Diwas
31 august ha divas "bhatke vimukta divas" mhanun sajara karanebabat aavashyak nidhi vitaran, san 2026-27.
Disbursement of necessary funds for celebrating "31st August" as "Bhatke Vimukta Diwas", year 2026-27.
"३१ ऑगस्ट" हा दिवस "भटके विमुक्त दिवस" म्हणून साजरा करणेबाबत आवश्यक निधी वितरण, सन २०२६-२७.
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९८/मावक, मुंबई
दिनांक: २७/०८/२०२६
वाचा :-
१) इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.९८/मावक, दिनांक ३१/०७/२०२५.
२) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी.कॉलनी शास्त्रीनगर, येरवडा, पुणे यांचे पत्र क्र. इमाबकसं/मावक/३१ ऑगस्ट-भटके विमुक्त दिवस/२६-२७/४७५१, दिनांक २०/०८/२०२६.
प्रस्तावना:-
सन १८७१ साली ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जमातींना गुन्हेगार म्हणून जाहीर केले. यामुळे या जातींमधील समाजबांधव स्वातंत्र्यानंतरही मुख्य प्रवाहापासून दूर राहीले. अमानुष अत्याचार पारतंत्र्यात सहन केल्यानंतर सुध्दा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भटके विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, ज्याचे दिर्घकालीन समाजिक परिणाम या समाजावर झाले. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना "विमुक्त जाती" (म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले. भटक्या जमाती (Nomadic Tribes) म्हणजे अशा समाजघटकांचा समूह की जे पारंपारिक पद्धतीने एकाच ठिकाणी न राहता फिरत्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करत असतात. भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहे. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान पाहता त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस "भटके विमुक्त दिवस साजरा करण्यास संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार विविध उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यानुषंगाने संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी संदर्भाधीन क्र.२ येथील पत्रान्वये राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संचालनालयास आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार उपलब्ध अर्थसंकल्पित तरतूद विचारात घेऊन आवश्यक निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
"३१ ऑगस्ट" हा दिवस "भटके विमुक्त दिवस" साजरा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपक्रम राबविण्यासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे व त्यांच्या अधिपत्याखालील ०७प्रादेशिक कार्यालये व ३६ जिल्हास्तरावरील कार्यालये अशा एकूण ४४ कार्यालयांकरीता एकूण रुपये ३०,००,०००/- (अक्षरी रुपये तीस लक्ष मात्र) इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर बाबीवर होणारा खर्च सन २०२६-२७ या वित्तीय वर्षात "मागणी क्रमांक झेड जी-३. प्रधानशीर्ष २२२५, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग अल्पसंख्याक यांचे कल्याण, ०३ मागासवर्गीयांचे कल्याण, ००१ संचालन व प्रशासन, (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, (०१) (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र संचालनालय (अनिवार्य) (दत्तमत) (२२२५ ई ७९५) या लेखाशिर्षाखाली "(१३) कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीत अनुदानातून खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३. सदरहू निधी वितरीत करण्याकरीता संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे हे "नियंत्रक अधिकारी" तसेच संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण हे "आहरण व संवितरण अधिकारी म्हणून राहतील.
४. संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी ज्या प्रयोजनार्थ निधीची मागणी केली आहे, त्याच प्रयोजनार्थ निधी खर्च करावा. सदर निधी खर्च झाल्यावर त्याबाबतच्या खर्चाचे विवरण (जिल्हानिहाय खर्च) व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करावे, वेळेच्या वेळी संबंधिताना वितरीत करण्यात येणाऱ्या रकमेचा वित्त प्रवाह (Cash Flow) बीम्स प्रणालीवर नोंदविण्यात यावा. तसेच, सदर निधी पूर्ण खर्च झाल्याबाबतच्या प्रमाणपत्रासह शासनास सादर करावा.
५. उपरोक्त आर्थिक वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे तपासण्याच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची राहील. तसेच, वित्तीय नियमावली, महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका यानुसार वेळोवेळी वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करुन कोणतीही वित्तीय अनियममितता होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांची राहील.
६. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक ०९/०४/२०२६ अन्वये विभागास प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२६०८२७१६२३३५३७३४ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by NITINKUMAR BABANRAO MAHADIK
Date: 2026.08.27 16:24:30 +05'30'
(नि.ब. महाडीक) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन



Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon