DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Receive Family Pension In Within Time

Receive Family Pension In Within Time

Receive Family Pension In Prescribed Time



परिपत्रक

कुटुंब निवृत्ती वेतन विहीत वेळेत मिळणेसाठी कार्यवाही करणेबाबत

महाराष्ट्र शासन,

शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१

क्र. शिआका/आस्था-क-माध्य/परिपत्रक /२०२४-२५/७४४६ 

दिनांकः १९/१२/२०२४

31 DEC 2024

विषय : कुटुंब निवृत्ती वेतन मिळणेबाबत विहीत वेळेत कार्यवाही करणेबाबत


उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की, मा.उप लोक आयुक्त यांच्याकडे कुटुंब निवृत्ती वेतन मिळणेबाबत प्राप्त तक्रार चे अनुषंगाने मा.उप लोकायुक्त यांच्या समोर दि.१३/१२/२०२३ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे झालेल्या सुणावणीमध्ये मा.उप लोकायुक्त यांनी कुटुंब निवृत्ती वेतन विहीत वेळेत मिळणेबाबत उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ च्या नियम १२० मधील तरतूदीनुसार शासकीय कर्मचा-यांच्या संबंधात निवृत्ती वेतन विषय कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर सोपविण्यांत आली आहे. कार्यालय प्रमुखांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे तयार करुन मा. महालेखापाल, यांचेकडे निवृत्ती वेतन/उपदान/निवृत्ती वेतनाचे अंशराशिकरण इत्यादीच्या प्राधिकृतीसाठी पाठवावीत. मा. महालेखापाल' यांनी या कागदपत्रांची आवश्यक ती तपासणी करुन प्रदान आदेश निर्गमित करावेत अशी तरतूद नियमान्वये करण्यांत आली आहे.



तथापी, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांची वेतननिश्चिती, रजा इत्यादी कार्यवाही वेळेत न पूर्ण झालेने त्यांचे सेवाविषयक कागदपत्रे पाठविण्यांस विलंब होतो. पर्यायाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांस त्यांचे सेवानिवृत्ती वेतन, उपदान, अंशराशिकरण, गटविमा योजना, शिल्लक रजा रोखीकरण व भविष्यनिर्वाह निधी इत्यादी देवकाच्या रक्कमा वेळीच अदा न केल्याने मा. न्यायालयीन प्रकरणे/मा. लोक आयुक्त प्रकरणे उद्भवतात.


सबब कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळीच निवृत्ती वेतन मिळण्याविषयी कार्यालयामार्फत करावी लागणारी आवश्यक ती कार्यवाही विहीत कालमर्यादेतच करावी. तसेच सेवानिवृत्ती नंतरचीही देयके त्यांना वेळीच अदा होतील याची दक्षता घेण्यांत यावी.

सदर सूचना आपले अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात याव्यात. वेळोवेळी आढावा घेवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

CIRCULAR PDF COPY LINK

(सूरज मांडरी भा.से.)

आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१

Regarding taking action to receive family pension in prescribed time

Regarding receiving family pension

Regarding taking action within prescribed time

 Government of Maharashtra

Commissionerate of Education, Maharashtra State, Central Building, Dr. Annie Besant Road. Pune


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon