Rashtra Purush Thor Vyakti Jayanti Rashtriy Din 2025
Celebration of birth anniversary and national day of Rashtra Purush / noble person in the year 2025
Regarding the celebration of birth anniversary and national day of Rashtra Purush / noble person in the year 2025
सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई
दिनांक: २७ डिसेंबर, २०२४.
परिपत्रक :-
सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत.
२. परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.
Also Read -
3, विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२२७१५४०२१७४०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
(सचिन र. कावळे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) दि.२७.१२.२०२४ चे परिशिष्ट सन २०२५ मध्ये मंत्रालय, शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती / राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी
अ.क्र.
जयंती/राष्ट्रीय दिन
इंग्रजी महिना व
दिवस
वार
भारतीय महिना व
दिवस
कार्यक्रमाचे स्वरुप
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon