Charcha Pragyavantashi SCERT Guidelines
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)
६) शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर), मुंबई
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चा प्रज्ञावंतांशी - क्षेत्र रोबोटिक्स (Interaction with Super Talented Students) या मासिक ऑनलाईन वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाणार आहे.
याचे पहिले पुष्प ज्यांच्यासमवेत गुंफले जाणार आहे ते आहेत...
प्रज्ञावंत
क्रिश कल्ला
इयत्ता 11 वी
School : Phillips Exeter Academy, USA
मुलाखतकार
राहूल रेखावार भा.प्र.से.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
दिनांक: दि. 1 जानेवारी 2025
वेळ : 4.00 pm
लिंक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्य
मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या निर्देशानुसार इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी "Interaction with Super Talented Students" (चर्चा प्रज्ञावंतांशी) या नावाने मासिक ऑनलाइन संवाद मालिका सुरू करण्याचे नियोजित आहे.
यात विविध क्षेत्रांमध्ये अतिशय असामान्य यश असणाऱ्या इयत्ता 12 वी पर्यंत च्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची मुलाखत मा. संचालक किंवा एखादे उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व यांच्यामार्फत घेतली जाईल आणि सदर सत्र YouTube Live असेल.
सर्वांना विनंती आहे की अशा उत्कृष्ट प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना ओळखून सर्व तपशीलासह त्यांचा बायोडेटा एकत्रित करा.
आपण अशा विद्यार्थ्यांची ओळख विविध क्षेत्रांत करून देण्याचा प्रयत्न करू आणि इतर हुशार विद्यार्थ्यांसाठी त्यांना प्रेरक म्हणून सादर करू तसेच त्यांना त्यांची योग्य ओळख देऊ.
तरी अशा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सर्व तपशीलासह बायोडेटा
📧 LINK
या ईमेलवर दि. 08/01/2024 रोजी पर्यंत पाठवावा.
अशा विद्यार्थ्यांची माहिती प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या कार्यालयाकडे वरील ईमेलवर पाठवावी.
विद्यार्थ्यांची माहिती पुढील नमुन्यात पाठवावी
॰ जिल्हा-
॰ विद्यार्थ्यांचे नाव-
॰ इयत्ता-
॰ शाळेचे नाव व पत्ता -
॰ शाळेचा UDISE नंबर
॰ मुख्याध्यापकाचे नाव व मोबाईल संपर्क क्रमांक
॰ विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील विशेष प्राविण्य याचा विस्तृत तपशील. (हा तपशील नेमक्या माहितीसह व्यवस्थितपणे देण्यात यावा )
परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा आणि प्राप्त करा
आदेशावरून
मा. संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon