DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MYGOVPOLL महाराष्ट्राच्या चित्ररथाने उलगडली गणेशोत्सवाची महती

MYGOVPOLL


महाराष्ट्राच्या चित्ररथाने उलगडली गणेशोत्सवाची महती !

समृद्ध संस्कृतीची ओळख असलेल्या महाराष्ट्रात सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाला सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामाजिक समरसता, सांस्कृतिक संवर्धन, धार्मिक पर्यटन तसेच आर्थिक उपक्रमांमधून गणेशोत्सव राज्याच्या आत्मनिर्भरतेला बळ देतो. या व्यापक महत्त्वाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सन २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून घोषित केला. 



याच पार्श्वभूमीवर यावर्षी “गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक” या विषयावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ सादर करण्यात आला आहे. चित्ररथाच्या अग्रभागी ढोल वाजवणारी महिला, मध्यभागी गणेशभक्त आणि मूर्तिकार, तर मागील भागात अष्टविनायकांची प्रतिकृती असलेली मंदिरे दर्शविण्यात आली आहेत. गणेशोत्सवाशी निगडित विविध सांस्कृतिक परंपरांचेही चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे.

कर्तव्यपथावर चित्ररथाच्या दोन्ही बाजूंनी पारंपरिक वेशातील लेझीम खेळणाऱ्या महिलांचा सहभाग असून, संपूर्ण संचलनात गणेशोत्सवाचे महत्त्व आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती एका जोशपूर्ण गीताद्वारे सादर केली आहे.

तुमचा एक SMS महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळवून देऊ शकतो.

7738299899 या क्रमांकावर "MYGOVPOLL 365969,11" SMS पाठवा मतदान आज रात्री ११:४५ वाजेपर्यंतच सुरू असून भरभरुन मतदान करा !




ALSO RAED -

क्षण अभिमानाचा... छत्रपतींच्या चित्ररथाचा.... महाराष्ट्राच्या कौतुकाचा....

नमस्कार,

२६ जानेवारी रोजी दिल्ली येथील कर्तव्यपथावर 'छत्रपती शिवाजी महाराज : लोकशाहीचे जनक' या चित्ररथाचे संचलन झाले आहे.

अतिशय चित्तवेधक आणि नितांत सुंदर चित्ररथ अनुभवायला मिळालेला आहे.आपणही अनुभवा 


🙏🙏🙏🙏🙏🙏



मोठ्या प्रमाणत युझर वाढल्याने ⃞ I'm nat a robot असा मेसेज आल्यास / व्हिडिओ प्ले होत नसल्यास फक्त    ⃞ I'm nat a robot मध्ये  ✔ असा चेकमार्क लावा 

🙏एक आवाहन🙏
'छत्रपती शिवाजी महाराज : लोकशाहीचे जनक' या विषयावर अतिशय आकर्षक असा #चित्ररथ अनुषंगिक माहिती व गाण्याच्या साथीने कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. चला मत नोंदवूया!

𝐘𝐨𝐮𝐫 𝐯𝐨𝐭𝐞 𝐜𝐚𝐧 𝐦𝐚𝐤𝐞 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐓𝐚𝐛𝐥𝐞𝐮 𝐍𝐨-𝟏.

➡️कसे नोंदवाल मत? 

👇मार्ग पहिला- 

    यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्ररथाची निवड ही ऑनलाइन पद्धतीने मत देऊन होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावे व आपल्या सर्व समूहावरही याबाबत माहिती द्यावी आणि सर्वांना मतदान करण्याचा आग्रह करावा, ही विनंती. कृपया आपण त्वरित आपले मतदान करावे. आपले स्नेही, मित्र, परिचित सर्वांना मतदान करण्यासाठी आग्रह करावा, ही विनंती.
Vote via SMS 

मत देण्याची प्रक्रिया:

आपल्याला एका मेसेजद्वारे आपले मत द्यावयाचे आहे, यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे -

7738299899 या क्रमांकावर आपणास खालील प्रमाणे मेसेज करायचा आहे.

MYGOVPOLL(स्पेस)344521(comma)9

म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल*MYGOVPOLL 344521,9

(MYGOVPOLL 344521,9 एवढाच भाग कॉपी करून आपणास मेसेज बॉक्समध्ये पेस्ट करता येऊ शकेल)

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon