DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Dr.Sarvepalli Radhakrishnan Quiz डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्मृतिदिन

 Dr.  Sarvepalli Radhakrishnan 

********************************
✹ १७ एप्रिल ✹
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्मृतिदिन
********************************
जन्म - ५ सप्टेंबर १८८८ (तामिळनाडू)
स्मृती - १७ एप्रिल १९७५ (चेन्नई)
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिवस म्हणून साजरा करतात. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९  ते १९४८ वर्षं पर्यंत शिक्षक म्हणून काम केले.
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा सर्वात आवडता विषय होता तो लेखन. शालेय जीवनापासूनच त्यांनी हा लेखनाचा छंद जोपासला होता. आपली मते, विचार ते निर्भीडपणे मांडीत आणि लिहीत. आपल्या लेखनातून सतत ते सत्याचाच पाठपुरावा करीत. त्यांच्या लेखनाला एक वेगळीच धार होती. तेज होते. त्यांचे लेखन मोजकेच होते. पण विचार करायाला लावणारे होते. 
    तत्वज्ञान हा तर त्यांचा सर्वात आवडता विषय. या विषयावर त्यांनी अनेक कसदार लेख विविध नियतकालिकांतून लिहिले. निरनिराळ्या विषयांवरील त्यांच्या ग्रंथाना सखोल तत्वज्ञानाची जोड मिळाली होती. साहजिकच या ग्रंथानी आम दुनियेत वाहवा मिळविली. त्यांचे ग्रंथ म्हणजे भारत देशाचा अमोल ठेवाच आहे. ते एक मैल्यवान लेणे होते. 
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी मोजकेच ग्रंथ लिहिले. पण त्या ग्रंथांनी त्यांना प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. या ग्रंथांची नावे जरी नजरेखालून घातली तरी त्यातील विषयांची विविधता उमगेल. त्यांची पुस्तके भारतीय तत्त्वज्ञानाची, धर्माची आणि संस्कृतिची ओळख करून देतात. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, धर्म व संस्कृती यांची ध्वजा दाही दिशांना सतत उंचच उंच फडकवित ठेवली. ही भारतीय साहित्याचे थोर सेवाच ठरली आहे. 
    भारताबाहेरील अनेक टीकाकार भारतीयांना प्राणापलीकडे प्रिय असणाऱ्या हिंदू धर्मावर, त्याच्या तत्त्वज्ञानावर, आचार-विचार, संस्कृतीवर, रीतिरिवाजावर सडकून टीका करायचे. या टीकेत जहालपण असायचे. विरोधक आणि टीकाकारांना आपल्या धार धार लेखणीने त्यांनी गप्प केले होते. 
Dr. Sarvepalli Radhakrishnan Quiz डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्मृतिदिना निमित्य प्रश्नमंजुषा सोडवा 
सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यां विद्यार्थ्या करीता उपयुक्त 
Solve the Quiz on occasion of Dr Sarvepalli Radhakrishnan smritidina 
Suitable for students appearing for all classes and all competitive examinations
PLEASE SOLVE QUIZ
CLICK HERE
 

संदर्भ : इंटरनेट

********************************
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon