Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2025 शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२५
MAHARASHTRA STATE BOARD OF ART
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
Maharashtra State Board of Art Education, Mumbai
क्रमांक :- कशिमं/२०२५-२६/पाच/३४
दिनांक :- ०८.०१.२०२६
वाचा :-
१) परिपत्रक क्रमांक कशिमं/२०२५/पाच/६७४, दिनांक १८.०७.२०२५
२) परिपत्रक क्रमांक कशिमं/२०२५/पाच/१०५१, दिनांक १६.१०.२०२५
परिपत्रक
[शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा - २०२५ ] निकाल जाहीर करणेबाबत.
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी https://msbae.ac.in या संकेतस्थळावरील GRADE EXAM या टॅबमध्ये व https://dge.msbae.in /https://dge.msbae.in/Result/Search/Form या लिंकवर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच तात्पुरते प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करणे / निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये किरकोळ त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.
https://msbae.ac.in या संकेतस्थळावरील GRADE EXAM या टॅबमध्ये व https://dge.msbae.in https://dge.msbae.in/Result/Search/Form या लिंकवर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच तात्पुरते प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करणे / निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये किरकोळ त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.
क्र | तपशील | इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा | एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा |
१ | निकाल दिनांक | दि.०९.०१.२०२६ दुपारी १.०० वा. | |
२ | प्रमाणपत्र | सहभागी शाळेंना लॉगइनवरुन ३ वेळा डाऊनलोड करता येईल. केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल. | |
३ | दुय्यम निकालत्रक | केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल. | |
४ | निकाल पडताळणी | ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक १२.०१.२०२६ ते दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत (प्रत्येकी रु.१००/-प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे.) | |
५ | प्रमाणपत्र दुरुस्ती | ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी प्रमाणे / माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अचूक नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी झाली असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक दिनांक १२.०१.२०२६ ते ३१.०१.२०२६ पर्यंतच प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.२००/-व (महाराष्ट्राबाहेरील रु.४००/-) प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करता येईल. | |
ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी प्रमाणे / माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अचूक नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी झाली असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक दिनांक १२.०१.२०२६ ते ३१.०१.२०२६ पर्यंतच प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.२००/-व (महाराष्ट्राबाहेरील रु.४००/-) प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करता येईल.
आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक ०९.०१.२०२६ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना / सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.
विहीत कालावधीमध्ये प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करुन निकालपत्रानुसार प्रमाणपत्र बरोबर असल्याची खातरजमा केंद्र प्रमुखांनी करुन संबंधितास वितरीत करण्यात यावे. डाऊनलोड केलेली प्रमाणपत्रे जतन करुन ठेवावीत. व संबंधितांना मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात यावीत. डाऊन लोड केलेली प्रमाणपत्रे व दुय्यम निकालपत्रके जतन करुन ठेवण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखाची राहील. केंद्र प्रमुखांनी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी जतन करुन ठेवावी व सहभागी शाळा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र प्रमुखांची राहील याची नोंद घेण्यात यावी.
संचालक,
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2025 शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२५
निकाल
शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ निकाल
Results Link ☞ अधिकृत संकेतस्थळमहाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण
विभाग कला संचालनालय,
महाराष्ट्र राज्य,
Website:-www.doa.maharashtra.gov.in
Email:- dirdoa.mummah@gov.in/ directorateofart@gmail.com
दिनांक :- १२.०७.२०२३
वाचावे :- शासन निर्णय क्रमांक /
एडीआर-२०१४/प्र.क्र.२१८/तांशि- ६, दिनांक १६.०२.२०१५.
परिपत्रक
शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास संदर्भीय दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुर्नरचित अभ्यासक्रमास सन २०१५ पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३ चे आयोजन ऑफलाईन पध्दतीने दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ ते दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
संबंधित केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने CLICKHERE या संकेतस्थळावर भरावयचे असल्यामुळे याबाबत परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या तक्ता खालील प्रमाणे
शासकीय रेखाकुल (एलिमेंटरी व
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
|
अ.क्र. |
विषयाचे नाव |
परीक्षेची वेळ |
|
बुधवार, दिनांक
०४ ऑक्टोबर, २०२३ |
||
|
१ |
वस्तुचित्र
(Object
Drawing) |
१०.३०
ते १.०० (२.३० तास) |
|
२ |
स्मरणचित्र
(Memory
Drawing) |
२.००
ते ४.०० (२.०० तास) |
|
गुरुवार, दिनांक
०५ ऑक्टोबर, २०२३ |
||
|
३ |
संकल्पचित्र
नक्षीकाम (Design) |
१०.३०
ते १.०० (२.३० तास) |
|
४ |
कर्तव्यभूमिती
व अक्षरलेखन (Plane
Geometry & Lettering) |
२.००
ते ४.०० (२.०० तास) |
|
इंटरमिजिएट ड्रॉईंग
ग्रेड परीक्षा वेळापत्रक शुक्रवार, दिनांक
०६ ऑक्टोबर, २०२३ |
||
|
१ |
स्थिरचित्र
(Still
Life) |
१०.३०
ते १.३० (३.०० तास) |
|
२ |
स्मरणचित्र
(Memory
Drawing) |
२.३०
ते ४.३० (२.०० तास) |
|
शनिवार, दिनांक
०७ ऑक्टोबर, २०२३ |
||
|
३ |
संकल्पचित्र
नक्षीकाम (Design) |
१०.३०
ते १.३० (३.०० लास) |
|
४ |
कर्तव्य
भूमिती,
घनभूमिती व अक्षरलेखन (Geometry, Solid
Geometry & Lettering) |
२.३०
ते ५.३० (३.०० तास) |
परिपत्रक सविस्तर वाचा
सन २०२३ च्या चित्रकला ग्रेड परीक्षा बाबत परिपत्रक DOWNLOAD करा
Also Read -
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2022 शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२२

.gif)



1 comments:
Click here for commentssir mi elementry exam certificate dowlaod nahi kele aata kase karu dowlaod
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon