DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

बढती, सेवाजेष्ठता पेन्शन व इतर लाभ देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्याची नियुक्तीची तारीख ग्राह्य धरावी - मॅटचे आदेश Pension

                            

Appointment date of Government Employee Officer should be accepted for promotion, seniority pension and other benefits - Matt's Order

Maharashtra Administrative Tribunal Matt

    बढती, सेवाजेष्ठता पेन्शन व इतर लाभ देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्याची नियुक्तीची तारीख ग्राह्य धरावी त्यासाठी शासनाच्या अध्यादेशात दुरुस्ती करावी असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटने अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन व वित्त विभाग यांना दिले आहेत हे सर्व लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकारी यांची सेवेत कायम झाल्याची तारीख ग्राह्य धरल्या जात होती त्यामुळे हंगामी सेवेचा लाभ मिळत नव्हता बढती सेवा जेष्ट्ता यासाठी विलंब होत होता पेन्शन कमी मिळत होत होती मॅटच्या आदेशामुळे कर्मचारी अधिकारी नियुक्तीच्या तारखेपासून सरकारी लाभासाठी पात्र ठरेल मॅट सदस्य विजयकुमार यांनी हे आदेश दिले आहेत सरकारी सेवांचा लाभ देण्यासाठी  नियुक्तीची तारीख ग्राह्य धरावी असे मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अनेक आदेशात स्पष्ट केले आहे त्याची अंमलबजावणी झालेली नाही याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशात दुरुस्ती होणे आवश्यक आहे त्यानुसार आता बदल करायला हवेत असेही  मॅटने आपल्या आदेशात नमूद केले आहे हंगामी सेवेचा कालावधी पेन्शन व इतर लाभासाठी ग्राह्य धरावा अशी मागणी करणारा अर्ज श्री घुमारे यांनी  मॅट मध्ये केला त्यावर  मॅटने आदेश दिलेला आहे
    हंगामी सेवेचा कालावधी पेन्शन व इतर लाभासाठी कायदा करावा अशी मागणी करणारा अर्ज काशिनाथ गोविंदराव ठोंबरे यांनी मॅट मध्ये केला होता १६ जून १९८९ रोजी ठोंबरे यांची परभणी जिल्हा कोषागार विभाग जूनियर कलर्क म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ११ नोव्हेंबर२००३  रोजी घुमरे यांना सेवेत कायम करण्यात आले होते  ०७ मार्च २०११  रोजी त्यांना बढती देण्यात आणि आता ते निवृत्त झाले आहेत मात्र ०७  ऑक्टोबर २०१६ च्या आदेशानुसार एमपीएससी परीक्षे द्वारे  नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई कार्यक्षेत्रात येत असलेले कर्मचारी यांची हंगामी कालावधी बढती साठी व इतर लाभासाठी ग्राह्य धरावा असे स्पष्ट करण्यात आले आहे त्या आधारे घुमरे  यांनी १९  जून १९८९ ते ०७  मार्च १९९९  हा त्यांच्या हंगामी सवेतील कालावधी बढती  व इतर लाभा साठी ग्राह्य धरावा अशी त्यांची मागणी केली त्याला प्रशासनाने विरोध केला घुमारे यांना ११ नोव्हेंबर २००३ रोजी सेवेत कायम करण्यात आले त्यांचा आगामी कालावधी लाभासाठी धरला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते त्यामुळे त्यांची हंगामी सेवा लाभासाठी ग्राह्य धरली  जाणार नाही असा दावा महाराष्ट्र  प्रशासनातर्फे केला गेलेला होता तो अमान्य करण्यात आला

हे ही वाचा 

बालदिवस सप्ताह अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेबाबत...

    दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी "बालदिवस सप्ताह" साजरा करण्यात आला होता.यानुसार बालदिवस सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

    यासाठीयावर क्लिक करून सहभागी विद्यार्थी यांनी यापूर्वी प्रणालीमध्ये नोंदविलेला आपला मोबाईल क्रमांक टाकून उपक्रमनिहाय आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon