DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

TALATHI BHARTI

TALATHI BHARTI


महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
त्रिशूल गोल्ड फिल्ड इमारत, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीवीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४.

Email Id: contact-secretary@mpsc.gov.in


क्रमांक : सीएमए-०४२६/प्र.क्र४२/२०२६/जाहिरात
दिनांक :- २२ जुलै, २०२६

-: शुद्धिपत्रक :-

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६ जाहिरात क्रमांकः ०१७/२०२६, दिनांक २५ जून, २०२६

आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक २५ जून, २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, आयोगाच्या दिनांक १६ जुलै, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धिपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रानिमं१२२४/प्र.क्र.७०/सेवा-४, (का.१३-अ), दिनांक ०५ मे, २०२६ अनुसार महाराष्ट्र गट-क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे :-



३. उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही.

४. सदर शुद्धिपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ.क्र. तपशील विहित कालावधी
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०५ ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI) शुल्क भरणे आवश्यक आहे.

५. सदर शुद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ मधून एकूण ५७०७ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
६. मूळ जाहिरातीमधील तसेच दिनांक १६ जुलै, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकातील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
(सं. पां. देशमुख) उप सचिव, जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग.


 CLICK HERE👇
 

अशा प्रकारच्या जाहिरातीसाठी आजच खालील लिंकवर क्लिक करा. 
WEBSITE FOLLOW


🪀 SOCIAL MEDIA

SUBSCRIBE
Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
June 23, 2023 at 9:05 PM ×

आपण सुंदर माहिती दिली आहे तलाठी भरती बाबत

Congrats bro प्रशांत शिपकुले एम. ए.एम. एड. set, net you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon